फोटो सौजन्य – X (BCCI)
काय म्हणाला मोहम्मद सिराज : भारताच्या संघाने पहिल्या तीन दिवस दुसऱ्या सामन्यामध्ये धुमाकुळ घातला. दुसऱ्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह खेळणार नाही त्यामुळे अनेक क्रिकेट तज्ञांनी देखील मोठे प्रश्न उपस्थित केले होते. सोशल मिडीयावर देखील मोठा गोंधळ उडाला होता. भारतीय संघामध्ये नितीश कुमार रेड्डीला सोडून नव्या दोन्ही खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली. यामध्ये वाॅशिग्टन सुंदर याने देखील फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले, त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या जागेवर आकाशदीप याला संघामध्ये स्थान मिळाले होते, त्याने या सामन्याच चार विकेट्स घेतले.
मोहम्मद सिराज याने संघाला 6 विकेट्स मिळवुन दिले. जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळत नाहीये, त्यामुळे सिराजच्या खांद्यावर अधिक जबाबदारी आहे, जी तो चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. त्याच वेळी, दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराजने बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, “मला जबाबदारी आणि आव्हाने आवडतात. जेव्हा तुम्हाला नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाते, तेव्हा विकेट जरी संथ असली तरी, माझे लक्ष्य पूर्ण शिस्तीने योग्य दिशेने गोलंदाजी करणे असते आणि मी धावा न देता कसून गोलंदाजी केली. आकाश दीपचा हा तिसरा किंवा चौथा सामना आहे तर प्रसिद्ध देखील नवीन आहे. म्हणूनच मी फलंदाजांवर दबाव आणण्याचे काम करत होतो, मला गोलंदाजीत सातत्य राखावे लागेल.”
MOHAMMAD SIRAJ’S INTERVIEW AFTER 6 WICKET HAUL Vs ENGLAND. 🌟 – Miyan Magic, The Star..!!!! pic.twitter.com/LoUTY8t24C — Tanuj (@ImTanujSingh) July 5, 2025
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अर्शदीप म्हणतो की, डायलाॅग बदला आणि म्हणा की ‘आय बिलिव्ह मी अॅड जस्सी भाई’ या डायलाॅगनंतर सिराज मोठमोठ्याने हसतो.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात मोहम्मद सिराजने इंग्लंडचा सर्वात मोठा खेळाडू जो रूटचा बळी घेऊन केली. त्यानंतर सिराजने कर्णधार बेन स्टोक्स, ब्रायडन कॉर्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांना बाद केले. त्याआधी दुसऱ्या दिवशी सिराजने जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. सिराजने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच ५ बळी घेतले आहेत. याशिवाय, ३२ वर्षांनंतर एजबॅस्टनमध्ये पाहुण्या गोलंदाजाने ६ बळी घेतले आहेत.