फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या दिनी भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये भारताच्या फलंदाजांनी तर धमाल केलीच गोलंदाजांनी देखील कहर केला. भारताचा संघ सध्या फलंदाजी करत आहे. टीम इंडीयाने दुसऱ्या डावामध्ये 407 धावांवर इंग्लिश फलंदांजांना रोखलं. भारताचा संघामधील अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराजने गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली आणि १९.३ षटकांत फक्त ७० धावा देत ६ विकेट घेतल्या. सिराजने आतापर्यंत भारतासाठी ३७ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने १०२ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करून सिराजने त्याच्या कारकिर्दीतील चौथ्यांदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
सिराजने यापूर्वी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. ४ वर्षांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पहिल्यांदाच एका डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. जुलै २०२३ मध्ये मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी केली आणि ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिराजने फक्त १५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. हे त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम आकडे आहेत. आता त्याने इंग्लंडविरुद्धही आपली गोलंदाजी कौशल्य सिद्ध केली आहे.
IND vs ENG : भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराजने सलामीवीर जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. दरम्यान, त्याने जो रूट आणि बेन स्टोक्स सारख्या दिग्गज फलंदाजांचे बळीही घेतले. हैदराबादमध्ये जन्मलेल्या या वेगवान गोलंदाजाने शोएब बशीर, ब्रायडन कार्स आणि जोश टंगू यांनाही आपल्या कामगिरीने गुडघे टेकण्यास भाग पाडले.
5⃣-Wicket Haul ✅ 4th FIFER in Test cricket for Mohammed Siraj 👏 👏 Updates ▶️ https://t.co/Oxhg97fwM7 #TeamIndia | #ENGvIND | @mdsirajofficial pic.twitter.com/3aQ75gEpra — BCCI (@BCCI) July 4, 2025
पहिल्या डावात स्कोअरबोर्डवर ५८७ धावा नोंदवून भारतीय संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली होती. यानंतर, जेव्हा इंग्लंड फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांनी फक्त ८५ धावांवर ५ विकेट गमावल्या. तथापि, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडचा डाव पुन्हा रुळावर आणला. इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर ऑलआउट झाला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने दुसऱ्या डावात एका विकेटच्या मोबदल्यात ६४ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडे २४४ धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवशी जेव्हा ते फलंदाजीसाठी उतरतील तेव्हा त्यांचे लक्ष्य इंग्लंडला मोठे लक्ष्य देण्याचे असेल.