गूरनूर ब्रारवर आयसीसीची कारवाई (फोटो- ians)
गूरनूर ब्रारच्या या कृतींची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ब्रारवर आयसीसीने कारवाई केली आहे. तसेच त्याच्या अकाऊंटमध्ये एक डिमेरिट पॉईंट देखील जोडण्यात आला आहे. त्यामुळे गूरनूर ब्रारवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. गूरनूर ब्रारच्या खात्यात जोडला गेलेल्या हा दुसरा डिमेरिट पॉईंट आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा अशी कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या चूका टाळण्यासाठी आणि मैदानावर योग्य आचारसंहिता पाळण्यासाठी आयसीसीने युवा खेळाडूंना कडक इशारा दिला असून, गुरनूर ब्रारसाठी हा एक मोठा धडा मानला जात आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एका रोमांचक सामन्यानंतर भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज गूरनूर ब्रारच्या अडचणीत वाढ झाली आहे. किवी संघाचा स्फोटक सलामीवीर टिम सीफर्टला आउट केल्यावर आक्रमक सेलिब्रेशनमुळे गुरनूर बराड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
न्यूझीलंडच्या डावातील १२ वोइ ओव्हर संपल्यानंतर ही संपूर्ण घटना घडली. गुरनूर ब्रारने अप्रतिम गोलंदाजी करत सेट फलंदाज टिम सीफर्टला बाद करण्यात यश मिळवले. विकेट मिळाल्याच्या आनंदात ब्रारचे नियंत्रण सुटले आणि त्याने अत्यंत आक्रमक असे सेलिब्रेशन केले. जे आयसीसीच्या नियमांच्या बाहेरचे कृत्य होते. या प्रकरणी आयसीसीने ब्रारवर आचारसंहितेच्या अनुच्छेद २.५ अंतर्गत दोषी धरून कारवाई केली आहे.
क्रिकेटच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूवर दोन वर्षांमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त काळवधीत चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉईंट्स जमा झाले, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्याच्यावर बंदी देकगीळ घातली जाऊ शकते. त्यामुळे ब्रारला मैदानात अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
Ans: न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सीफर्टला बाद केल्यानंतर गूरनूर ब्रारने आक्रमकपणे जल्लोष केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
Ans: आयसीसीने गूरनूर ब्रारच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडला आहे. गेल्या दोन वर्षांत त्याच्यावर दुसऱ्यांदा अशी कारवाई झाली आहे.






