Gurnoor Brar Breaks Zaheer Khan’s Record
या प्रभावी कामगिरीमुळे, गुरनूरने न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय वेगवान गोलंदाजाने केलेल्या दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत त्याने मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना मागे टाकले. तसेच त्याने झहीर खालचा २३ वर्षे जुना विक्रमही मोडला.
गुरनूर ब्रारने सामन्याच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला. त्याची पहिली पाच षटके उत्कृष्ट होती.यामध्ये त्याने केवळ सहा धावा देऊन दोन विकेट्स घेतले. त्याने आपल्या पाचव्या षटकात टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांना बाद करून किवींचे कंबरडे मोडले. त्यानंतर गुरनूरने किवी कर्णधार मिचेल सँटनर आणि नॅथन स्मिथ यांना बाद केले. गुरनूरने १० षटकांत ४ विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यासह, गुरनूरने न्यूझीलंडमधील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. त्याने, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग सारख्या गोलंदाजांना मागे टाकले. या यादीत माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ अव्वल स्थानी आहे. जवागलने २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २३/४ अशी कामगिरी नोंदवली होती.






