Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Test Rankings : शुभमन गिलची मोठी डरकाळी! कसोटी क्रमवारीत हॅरी ब्रूक अव्वल; जो रुटचे साम्राज्य खालसा

आयसीसीकडून बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या ताज्या क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने उंच उडी घेऊन कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम ६ व्या स्थानी पोहोचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 09, 2025 | 08:10 PM
ICC Test Rankings: Shubman Gill's big scare! Harry Brook tops Test rankings; Joe Root's empire ends

ICC Test Rankings: Shubman Gill's big scare! Harry Brook tops Test rankings; Joe Root's empire ends

Follow Us
Close
Follow Us:

ICC Test Rankings : आयसीसीने बुधवारी ताजी  क्रमवारी जाहीर केली असून कसोटी क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ झाली आहे.   या ताज्या क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने उंच उडी घेतली आहे. गिल त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीवर पोहोचला आहे. गिल त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. त्याच वेळी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटला त्याच्याच संघ सहकारी असणाऱ्या हॅरी ब्रूकने मागे टाकले आहे. हॅरी ब्रूक आता फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध सुरू असणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले. त्याने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात १५० पेक्षा जास्त धावा करणारा तो इतिहासातील दुसराच खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा : Siliguri communal clash : क्रिकेट सामन्यादरम्यान किरकोळ वादाचा उडाला भडका! दुकानांसह घरांचीही तोडफोड; पहा Video

गिल पोहचला सहाव्या क्रमांकावर

गिलने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत १५ स्थानांनी झेप घेतली आहे.  त्याने सध्याच्या मालिकेची सुरुवात २३ व्या स्थानावरून केली आणि आता तो 6 व्या स्थानी जाऊन बसला आहे. या मालिकेत त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर तो मालिकेच्या अखेरीस अव्वल स्थान गाठू शकतो.

 

Harry Brook reclaims the 🔝 spot in the latest ICC Test batter rankings after his spirited knock against India 👏 More ➡️ https://t.co/Df4PDR7PNf pic.twitter.com/ZxZnEazGXR — ICC (@ICC) July 9, 2025

तर दुसरीकडे, इंग्लंडचा हॅरी ब्रूकने बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १५८ धावांची खेळी केली, ज्यामुळे तो फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत एक स्थानवर जाऊन बसला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रूक यापूर्वी एका आठवड्यासाठी नंबर-१ कसोटी फलंदाज बनला होता. इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथलाही या मालकीत क्रमवारीसाठी फायदा झाला आहे, त्याने नाबाद १८४ आणि ८८ धावा करून पहिल्यांदाच १६ स्थानांनी वर जाऊन टॉप-१० मध्ये प्रवेश दस्तक दिले.

भारतीय गोलंदाजांनाही झाला फायदा

एजबॅस्टन कसोटीत ८९ आणि ६९ धावांची खेळी करणारा रवींद्र जडेजा सहा स्थानांनी पुढे जाऊन ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या देखील कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत सुधारणा झाली.  सिराज आणि आकाश दीप अनुक्रमे २२ व्या आणि ४५ व्या स्थानावर पोहोचले आहे.

क्रमावरीत फायदा झालेले इतर खेळाडू

बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ३६७ धावांची विक्रमी खेळी करणारा दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर फलंदाजी क्रमवारीत ३४ स्थानांनी झेप घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम २२ व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच त्याने तीन विकेट्सही घेतल्या, ज्यामुळे तो आता गोलंदाजांच्या यादीत त्याला चार स्थानांचा फायदा होऊन ४८ व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा : IND VS ENG : लॉर्ड्स कसोटीसाठी ब्रिटिश भारताविरुद्ध उतरवणार ‘हे’ घातक शस्त्र; इंग्लंडची प्लेइंग-११ जाहीर

Web Title: Icc test rankings shubman gills big leap harry brook tops test rankings joe roots empire ends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Harry Brook
  • ICC
  • ICC Rankings
  • Joe Root
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND VS AUS 1st ODI : “विजयाची अपेक्षा करू नये…”, पर्थमधील पराभवाने माजी दिग्गज लालेलाल; कर्णधार गिलवर केली प्रश्नांची सरबत्ती 
1

IND VS AUS 1st ODI : “विजयाची अपेक्षा करू नये…”, पर्थमधील पराभवाने माजी दिग्गज लालेलाल; कर्णधार गिलवर केली प्रश्नांची सरबत्ती 

PAK-AFG WAR : ICC च्या ‘त्या’ विधानाने पाकला झोंबली मिरची! अफगाणी क्रिकेटपटू मृत्यू प्रकरण; वाचा सविस्तर 
2

PAK-AFG WAR : ICC च्या ‘त्या’ विधानाने पाकला झोंबली मिरची! अफगाणी क्रिकेटपटू मृत्यू प्रकरण; वाचा सविस्तर 

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 
3

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर गंभीरने घेतली शुभमन गिलची शाळा! कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना
4

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर गंभीरने घेतली शुभमन गिलची शाळा! कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.