सिलीगुडीतील बाग्राकोट येथे पोलिस बचाव करताना(फोटो-सोशल मिडिया)
Siliguri communal clash : सिलीगुडीतील बाग्राकोट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिसरात क्रिकेट सामन्यादरम्यान एका छोट्याशा भांडणाचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले. बुधवारी दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याला अचानक हिंसक वळण लागले. या हिंसाचारात केवळ वाहनेच जाळण्यात आली नसून अनेक दुकाने आणि घरांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने अचानक परिसरात गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
स्थानिक वृत्तांनुसार, बाग्राकोटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान काही निर्णयावरून दोन समुदायांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला. सुरुवातीला हे प्रकरण खूप छोटे असल्याचे दिसत होते. परंतु, लवकरच या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि नंतर थेट हाणामारीत झाले. काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण हे प्रकरण आणखच जास्त चिघळले आणि दंगल घडून आली.
हेही वाचा : IND VS ENG : लॉर्ड्स कसोटीसाठी ब्रिटिश भारताविरुद्ध उतरवणार ‘हे’ घातक शस्त्र; इंग्लंडची प्लेइंग-११ जाहीर
यावेळी लवकरच दोन्ही बाजूंचे लोक जमले आणि दगडफेक करू लागले. काही लोकांनी दुकाने आणि वाहनांची देखील तोडफोड सुरू केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गर्दी कशी हिंसक झाली हे स्पष्टपणे दिसून येत आहे. दगडांच्या पावसात पोलिसही पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सगळीकडे जाळपोळ आणि चेंगराचेंगरी सुरू झाली होती.
#WATCH | West Bengal: Local people pelt stones on Police and security personnel deployed in Siliguri’s Bagracote area following a clash between two groups here. The security personnel are trying to bring the situation under control. pic.twitter.com/RlmiRZJ6VX
— ANI (@ANI) July 9, 2025
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की पोलिसांनाही त्याठिकाणी स्वतःचा बचाव करावा लागला. हिंसक जमावाने पोलिसांवर देखील दगडफेक करण्यास सुरवात केली. ज्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शेवटी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.
घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण बाग्राकोट परिसरात मोठ्या संख्येने पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु वातावरण तणावपूर्णच आहे. लोकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही देखील दिसून येत आहेत.
हेही वाचा : Wimbledon 2025 : अल्काराजचा विजयी रथ सुसाट! अँलेक्स डी मिनौरल नमवत दिली सेमीफायनलमध्ये धडक
स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे की, सिलिगुडी नेहमीच शांततापूर्ण शहर राहिले आहे. येथे विविध समुदायांचे लोक वर्षानुवर्षे एकत्र राहत आले आहेत. त्यामुळे या प्रकारच्या जातीय हिंसाचाराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तसेच काही लोकांचा असा विश्वास आहे की क्रिकेट सामना हा फक्त एक निमित्त ठरले आहे. खरं तर हा संघर्ष पूर्वीपासून असलेल्या तणावामुळे झाला आहे.