इंग्लंड टीम(फोटो-सोशल मीडिया)
IND VS ENG 3 rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी लॉर्ड्स येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपली प्लेइंग-११ जाहीर केली आहे. एक विशेष म्हणजे जोफ्रा आर्चर तब्बल ४ वर्षांनी या संघात परतला आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ मजबूत दिसत आहे. आर्चर लॉर्ड्स येथे २०२१ नंतर आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
एजबॅस्टन येथे भारताने इंग्लंडला ३३६ धावांनी धूळ चारली. त्यानंतर, लॉर्ड्स कसोटीसाठी संघात जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघानी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी, इंग्लंडने आर्चरचा संघात समावेश करून आपले गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जोश टंगूची जागा घेणार आहे. लॉर्ड्स येथे सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या पुरुष संघाकडून आपल्या इलेव्हनमध्ये हा एकमेव बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Wimbledon 2025 : अल्काराजचा विजयी रथ सुसाट! अँलेक्स डी मिनौरल नमवत दिली सेमीफायनलमध्ये धडक
ईसीबीने आर्चरबद्दल काय म्हटले आहे?
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर नॉटिंगहॅमशायरच्या जोश टँगची जागा घेणार आहे. फेब्रुवारी २०२१ नंतर आर्चरचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळलाया आहे.”
कोपर आणि पाठीच्या दुखापतीनंतर, जोफ्रा आर्चर २०२१ पासून इंग्लंडसाठी फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळला आहे. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केल्यापासून ३० वर्षीय वेगवान गोलंदाजाने १३ कसोटींमध्ये ३१.०४ च्या सरासरीने ४२ बळी मिळवले आहे.
इंग्लंड संघात केवळ एक बदल केला आहे. इंग्लंड संघ जॅक क्रॉलीलाच कायम ठेवले आहे. दोन्ही सामन्यांमध्ये जॅक क्रॉलीची कामगिरी चांगली राहिली नाही. तथापि, त्यानंतरही त्याला प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करूनही जोश् टँगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.