फोटो सौजन्य - INTERNATIONAL MASTERS LEAGUE सोशल मीडिया
India Masters vs West Indies Masters, Final : २०२५ च्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम फेरीसाठी स्टेज सज्ज झाला आहे. १६ मार्च रोजी रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया मास्टर्सचा सामना वेस्ट इंडिज मास्टर्सशी होणार आहे. अंतिम सामना पाहणे आणखी मनोरंजक असेल कारण सर्व काळातील दोन महान क्रिकेटपटू, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा एकमेकांसमोर उभे ठाकतील. इंटरनॅशन मास्टर्स लीग २०२५ दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज दोघेही अपवादात्मक फॉर्ममध्ये आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली, इंडिया मास्टर्सने खेळलेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आणि पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर राहिले. दुसरीकडे, वेस्ट इंडिज मास्टर्सने पाचपैकी तीन सामने जिंकले आणि दोन गमावले आणि चौथे स्थान पटकावले. मनोरंजक गोष्ट म्हणजे, गट फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. आगामी सामन्यात संघ पुन्हा एकदा अशाच निकालाची आशा करेल. इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ चा अंतिम सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे खेळला जाईल.
इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे, या सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता होईल. इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ फायनलचे थेट प्रक्षेपण भारतातील कलर्स सिनेप्लेक्स (एचडी आणि एसडी) आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे.या फायनलच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे.
सचिन तेंडुलकर (कॅप्टन), अंबाती रायुडू, गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, युवराज सिंग, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, नमन ओझा (विकेटकिपर), अभिमन्यू मिथुन, धवल कुलकर्णी, पवन नेगी, राहुल शर्मा, शाहबाज नदीम, विनय कुमार
ब्रायन लारा (कर्णधार), ख्रिस गेल, कर्क एडवर्ड्स, लेंडल सिमन्स, नरसिंग देवनरीन, अॅशले नर्स, ड्वेन स्मिथ, चाडविक वॉल्टन (यष्टीरक्षक), दिनेश रामदिन (विकेटकिपर), विल्यम पर्किन्स (विकेटकिपर), फिडेल एडवर्ड्स, जेरोम टेलर, रवी रामपॉल, सुलेमान बेन, टिनो बेस्ट