In ICC Rankings Jasprit Bumrah's Reign Ends Bowler Kagiso Rabada who Took 300 Wickets Gets Second Good News in a Week
ICC Ranking : जसप्रीत बुमराहचे सिंहासन हिसकावले; 300 बळी घेणाऱ्या दक्षिण अफ्रिकेच्या रबाडाने मारली बाजी
ICC Ranking : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा कसोटी गोलंदाजांच्या ICC क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाने नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने कसोटीत आपल्या विकेट्सची संख्या 300 वर नेली. दक्षिण आफ्रिकेला पहिली कसोटी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रबाडाला याचे बक्षीस मिळाले आहे.
जसप्रीत बुमराहचे पहिले स्थान हिसकावले, कासिगो रबाडा नंबर वन
Proteas bowlers dismantled Bangladesh's top-order, wrapping up a strong Day 2 🔥 #WTC25 | 📝 #BANvSA: https://t.co/uVYIndSqLJ pic.twitter.com/wWBi4aIKg4
— ICC (@ICC) October 30, 2024
बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव
कागिसो रबाडाच्या शानदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर, रबाडाने बुमराह, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि भारताचा रविचंद्रन अश्विन यांना मागे टाकून 2019 च्या सुरुवातीपासून प्रथमच प्रथमच क्रमांक 1 गाठला आहे. जानेवारी 2018 मध्ये तो प्रथमच शीर्षस्थानी पोहोचला आणि तेव्हापासून तो सतत टॉप 10 मध्ये राहिला. फेब्रुवारी 2019 मध्येच त्यांनी आपले पद गमावले. हेजलवूड आता दुसऱ्या स्थानावर आहे, तर बुमराह आणि अश्विन अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर घसरले आहेत.
पाकिस्तानचा स्टार फिरकीपटूने गाठले नंबरवनचे रॅंकींग
पाकिस्तानचा स्टार फिरकीपटू नोमान अलीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले आहे. तो टॉप 10 मध्ये पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत नोमानने 9 विकेट घेतल्या होत्या. या चमकदार कामगिरीच्या जोरावर नोमानने 8 स्थानांनी झेप घेत नवव्या स्थानावर पोहोचले आहे.
कोहिनूर हिरा, जसप्रीतला जपून ठेवण्याची गरज
जसप्रीत बुमराह एक दिग्गज खेळाडू आहे. त्याने दिलेल्या उत्तरावर आता पुन्हा प्रश्न विचारला जात आहे. बुमराह असे उत्तर कसे देऊ शकतो. यावर रविचंद्रन अश्विनने चांगलाच संताप व्यक्त करीत तो एक दिग्गज खेळाडू आहे. आमच्या भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा आहे. त्याने एवढ्या कडक उन्हात चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर केलेली गोलंदाजी निश्चितच स्तुतीला पात्र आहे. जसप्रीत बुमराह भारताला एवढे सामने जिंकून देत आहे, मग त्याला सांभाळण्याची गरज आपली आहे.
जसप्रीतने भारताला भरपूर सामने जिंकून दिले
जसप्रीत बुमराहने टी-20 वर्ल्ड कपमध्ये अनेक सामने भारताला जिंकून दिले, तो भारतीय क्रिकेटला मिळालेले एक वरदान आहे. असे असताना त्याच्या बोलण्यावर का प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याला पाहिजे ते बोलू दे. एक तर तुम्ही त्याला पहिल्यांदा बोलावता त्याला प्रश्न विचारता आणि त्याने उत्तर दिल्यानंतर त्याने असे कसे उत्तर दिले म्हणून विचारता हे योग्य नाही. त्याला पाहिजे ते बोलूदे, तो भारतीय क्रिकेटचा चमकता तारा आहे. आज कपिल देवनंतर त्यानेच भारताला गोलंदाजीने सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. त्याच्यासारखा गोलंदाज पुन्हा पुन्हा होत नाही. एवढ्या कडक उन्हात 145 च्या स्पीडने तो गोलंदाजी करीत आहे. चेपाॅकच्या फ्लॅट पिचवर तो दमदार गोलंदाजी करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे.
हेही वाचा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धुरा विराटच्या खांद्यावर; किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB होणार चॅंम्पियन?
हेही वाचा : वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध वनडे सिरीजसाठी केली टीमची घोषणा, स्टार खेळाडूची एंट्री