वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. डिसेंबर 2023 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळून शिमरॉन हेटमायर राष्ट्रीय संघात परतला असून ही वेस्ट इंडिजसाठी आनंदाची बाब आहे. ॲलेक अथांगेच्या जागी हेटमायरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे गुरुवारी अँटिगा येथे खेळवला जाणार आहे. कॅरेबियन संघाने श्रीलंका दौऱ्यावर पाठवलेल्या संघाच्या तुलनेत केवळ एक बदल केला आणि ॲलेक अथांगेच्या जागी हेटमायरचा समावेश करण्यात आला आहे. हेटमायर वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंका दौऱ्यात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे आता सगळं लक्ष त्याच्या कामगिरीकडे लागून राहिले आहे (फोटो सौजन्य – Instagram)
शिमरॉनची वापसी
शिमरॉन हेटमायरने अलीकडेच कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती, जिथे तो पाचवा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. हेटमायरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या कॅरेबियन संघाची फलंदाजी बळकट होईल. तसे पाहता, कॅरेबियन संघाने गेल्या वर्षी मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला होता आणि अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
हेदेखील वाचा – Lucknow Super Giants मधून के एल राहुलचा पत्ता कट? या कॅरेबियन खेळाडूला लागला जॅकपॉट
इंग्लंडचा त्रास वाढला
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. यजमान संघ आपल्या घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीतून बरा होत असल्याने लियाम लिव्हिंगस्टोन इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल. यामुळे सध्या वेस्ट इंडिजचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.
कोचने केले वक्तव्य
वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी आगामी एकदिवसीय मालिकेबद्दल उत्साह व्यक्त केला. सॅमी म्हणाला की, इंग्लंडविरुद्धचे सामने नेहमीच रोमांचक असतात आणि त्याचा संघ खडतर स्पर्धेसाठी सज्ज असतो. सॅमीने पुढे सांगितले की, “इंग्लंडविरुद्ध खेळणे नेहमीच नवीन आव्हान असते. जेव्हा आम्ही इंग्लंडचा सामना करतो तेव्हा आम्हाला आमचा खेळ कसा उंचावायचा आहे याचा योग्य मार्ग शोधावा लागतो. 17 वर्षीय ज्वेल अँड्र्यूने श्रीलंका दौऱ्यावर छाप पाडली. अनुभवी खेळाडूंसह तो संघात नवी ऊर्जा भरेल अशी अपेक्षा आहे.
हेदेखील वाचा – Champions Trophy: पाकिस्तानचा नवा कॅप्टन रिझवानची आशा, ‘भारताचे पाकिस्तानमध्ये…’
वेस्ट इंडिज-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
31 ऑक्टोबर 2024 – पहिली वनडे – अँटिग्वा
2 नोव्हेंबर 2024 – दुसरी वनडे – अँटिग्वा
6 नोव्हेंबर 2024 – तिसरी वनडे – बार्बाडोस
कसा आहे संघ
शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड आणि हेडन जे वॉल्श