फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रणजी सामन्यात शार्दुल ठाकूरने घेतली हॅट्रिक : सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत, यामध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाचे अनेक खेळाडू सामने खेळताना दिसत आहेत. यामध्ये यशस्वी जैस्वालपासून ते रोहित शर्मापर्यत टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. मागील काही सामन्यांमध्ये भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरने मैदानामध्ये बॅटने कहर केला होता. आता पुन्हा शार्दूल ठाकूर पुन्हा त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गुरुवारी मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये रणजी ट्रॉफी २०२४-२५ सामन्याच्या पहिल्या दिवशी मेघालयविरुद्ध हॅटट्रिक करून कहर केला आहे.
पाहुण्या संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईसाठी गोलंदाजीची सलामी देताना ठाकूरने मेघालयचा सलामीवीर निशांत चक्रवर्तीला पहिल्याच षटकात एकही विकेट न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि तिसऱ्याच षटकात हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली. षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर बी अनिरुद्ध, सुमित कुमार आणि जसकिरत यांना शून्यावर बाद करून ठाकूरने प्रथम श्रेणीची हॅट्ट्रिक साधली. ३३ वर्षीय ठाकूरने गेल्या सामन्यात मुंबईसाठी शानदार शतक झळकावले होते, ज्यामध्ये गतविजेत्या संघाला त्याच मैदानावर गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे त्यांची बाद फेरीत जाण्याची शक्यता संपुष्टात आली होती.
Hat-trick for Mumbai’s Shardul Thakur in the Ranji Trophy match against Meghalaya! 🤯🔥🔥
He becomes the 5th bowler for Mumbai to claim a hat-trick in the Ranji Trophy history. 👏
Lord Thakur for a reason! 🙇#ShardulThakur #RanjiTrophy #RanjiTrophy2025 pic.twitter.com/69gwcHydMM
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) January 30, 2025
मुंबई विरुद्ध मेघालया यांच्यामध्ये सध्या सामना सुरु आहे. या सामन्यांमध्ये मेघालय संघाची हालत खिळखिळी केली आहे. आतापर्यत १५ ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये मेघालयाच्या संघाने ७ विकेट्स गमावून फक्त ४७ धावा केल्या आहेत. मुंबईचा संघ कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी करत आहे. या सामन्यांमध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने ४ विकेट्स घेतले आहेत. तर मोहित अवस्थीने ३ विकेट्स संघासाठी घेतले आहेत.
मागील बऱ्याच काळापासून भारताच्या संघामध्ये शार्दूल ठाकूरला संधी मिळाली नाही. टीम इंडियामधून त्याला सातत्याने वगळले जात आहे. रणजी ट्रॉफीच्या मागील काही सामन्यांमध्ये शार्दूलने त्याच्या गोलंदाजीनेच नाही तर फलंदाजीने देखील संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्याला आगामी मालिकांमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. मागील सामन्यांमध्ये त्याने कठीण काळामध्ये संघासाठी शतक ठोकले होते, हे टीम मुंबईतील दिग्गज खेळाडूंना जमले नव्हते.