Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranji Trophy : एकाच डावात दोन त्रिशतकांचा विक्रम; गोव्याच्या खेळाडूंनी रचला इतिहास; एकाच्या 300 तर दुसऱ्याच्या 314 धावा

रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याच्या दोन खेळाडूंनी अरुणाचल प्रदेशविरुद्ध एकाच डावात 300 धावा करण्याचा विक्रम केला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 14, 2024 | 06:26 PM
Ranji Trophy Record : एकाच डावात दोन त्रिशतकांचा विक्रम; गोव्याच्या खेळाडूंनी रचला इतिहास; एकाच्या 300 तर दुसऱ्याच्या 314 धावा

Ranji Trophy Record : एकाच डावात दोन त्रिशतकांचा विक्रम; गोव्याच्या खेळाडूंनी रचला इतिहास; एकाच्या 300 तर दुसऱ्याच्या 314 धावा

Follow Us
Close
Follow Us:

पोर्वोरिम (गोवा) : गोव्याच्या कश्यप बाकले आणि स्नेहल कौठणकर यांनी रणजी ट्रॉफी सामन्यात इतिहास रचला. या दोघांनीही शानदार फलंदाजी करीत अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. कश्यप बाकलेचा हा पहिला पदार्पणाचा सामना आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 300 धावांची नाबाद खेळी खेळली आहे, तर स्नेहलच्या नावावर 314 नाबाद धावा आहे. गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात पहिल्या डावात अर्जुन तेंडुलकरने इतिहास रचला. अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या डावात अर्जुन तेंडुलकरने भेदक गोलंदाजी करीत 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. अर्जुन तेंडुलकरने अ.प्रदेशच्या वरच्या फळीतले 5 फलंदाज बाद केले.

गोव्याच्या फलंदाजांनी रचला इतिहास
अर्जुन तेंडुलकरच्या गोवा संघासाठी दोन फलंदाजांनी इतिहास रचला आहे. गोव्यासाठी, अरुणाचल प्रदेशविरुद्ध दोन फलंदाजांनी शानदार फलंदाजी करीत त्रिशतक झळकावले आहे. या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कश्यप बाकलेने शानदार फलंदाजी करीत नाबाद 300 धावा केल्या, तर स्नेहल कौठणकरने शानदार फलंदाजी करीत स्कोअर बोर्डवर नाबाद 314 धावा केल्या. या दोघांच्या दमदार फलंदाजीमुळे गोव्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात 92 षटकांत केवळ 2 गडी गमावून 727 धावा केल्या.

गोव्याच्या फलंदाजांनी रचला इतिहास

🚨 Record Alert Goa batters Kashyap Bakle (300*) & Snehal Kauthankar (314*) have registered the highest-ever partnership in #RanjiTrophy history! An unbeaten 606 runs for the 3rd wicket in the Plate Group match against Arunachal Pradesh 👏 Scorecard: https://t.co/7pktwKbVeW pic.twitter.com/9vk4U3Aknk — BCCI Domestic (@BCCIdomestic) November 14, 2024

या धावसंख्येसह त्याने डाव घोषित केला तेव्हा दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६०६ धावांची भागीदारी झाली. कश्यपने 269 चेंडूंचा सामना करताना 39 चौकार आणि 2 षटकार ठोकले. दुसरीकडे स्नेहलने त्याच्यापेक्षा कमी चेंडू खेळून जास्त धावा केल्या. स्नेहलने केवळ 215 चेंडूत 45 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये नाबाद ६०६ धावांची भागीदारी झाली, पण एक मोठा विक्रम मोडण्यात ते चुकले.

गोव्याच्या संघाचा 727 धावांवर डाव घोषित
गोव्याच्या संघाने 727 धावांवर डाव घोषित केल्यानंतर अरुणाचल प्रदेशची दुसऱ्या डावात चांगलीच तारांबळ उडाली. एवढ्या मोठ्या धावसंख्येसमोर अरुणाचल प्रदेशचा डाव गडगडला. गोव्याच्या भेदक गोलंदाजीसमोर अरुणाचल प्रदेशच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. एकाही फलंदाजाला 31 च्या वर धावा करता आल्या नाहीत. गोव्याकडून लक्ष्य गर्गने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर दीपराज गोनकरने 2 तर केथ पिंटोने 2 विकेट घेत अरुणाचल प्रदेशला धूळ चारली. गोव्याच्या भेदक गोलंदाजीसमोर अरुणाचल प्रदेशची दाणादाण उडाली.

गोवा विरुद्ध अरुणाचलप्रदेश सामना अहवाल

अरुणाचल प्रदेश पहिला डाव – 84 धावा, 30.0 षटके,
गोवा पहिला डाव – 727 धावा डाव घोषित, 92 षटके
अरुणाचल प्रदेश दुसरा डाव – 92 धावा, 22.3 षटके

श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंचा विक्रम अबाधित

विश्वविक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे, ज्यांनी 2006 मध्ये 624 धावांची भागीदारी केली होती. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये कोणत्याही विकेटसाठी केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. दुसरीकडे, रणजी ट्रॉफी सामन्यातील एकाच डावात दोन फलंदाजांनी त्रिशतक ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वीचा विक्रम
यापूर्वी 1998 मध्ये डब्ल्यूव्ही रमण आणि अर्जुन कृपाल सिंग यांनी गोव्याविरुद्ध 300 हून अधिक धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे याच सामन्यात महान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या होत्या. महान सचिन तेंडुलकरला त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत कधीही पाच बळी घेता आल्या नाहीत.

एकीकडे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज झगडत आहेत, तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा नव्या फलंदाजांचा उदय होणे ही भारतीय क्रिकेटसाठी चांगली गोष्ट आहे. आता तो किती लवकर टीम इंडियात प्रवेश करतो हे पाहायचे आहे.

Web Title: In ranji trophy goa players creat history two triple centuries against arunachal pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 06:26 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • bcci
  • Goa
  • ranji trophy

संबंधित बातम्या

बांग्लादेशचा हट्टीपणा सुरूच… T20 World Cup 2026 चे ठिकाण बदलण्यासाठी आयसीसीवर दबाव
1

बांग्लादेशचा हट्टीपणा सुरूच… T20 World Cup 2026 चे ठिकाण बदलण्यासाठी आयसीसीवर दबाव

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा
2

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा

KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? काय सांगतो नियम?
3

KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? काय सांगतो नियम?

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं
4

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.