Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs NZ A : भारताला विजयासाठी हवी होती फक्त एक विकेट, पण…

IND A vs NZ A: भारत 'ए' संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज असताना खराब प्रकाशामुळे सामना ड्रॉ झाला. देवदत्त पडिक्कलचे 199 धावा आणि भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी चर्चेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 27, 2026 | 04:48 PM
IND A vs NZ A : भारताला विजयासाठी हवी होती फक्त एक विकेट, पण...

IND A vs NZ A : भारताला विजयासाठी हवी होती फक्त एक विकेट, पण...

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडला विजयासाठी 313 धावांचे आव्हान
  • दुसऱ्या डावात भारताचे गोलंदाज चमकले
  • एक तास आधीच सामना थांबवण्यात आला
 

IND A vs NZ A : भारत ‘ए’ आणि न्यूझीलंड ‘ए’ यांच्यात खेळवण्यात आलेला पहिला अनधिकृत कसोटी सामना खराब प्रकाशामुळे ‘ड्रॉ’च्या रुपात समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय भारतासाठी एकप्रकारे धक्काच होता, कारण सामना अशावेळी थांबवण्यात आला, जेव्हा भारतीय संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती.

सामन्याबाबत बोलायचे झाले तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने निराशाजनक फलंदाजी केली आणि अवघ्या 113 धावांत ते गारद झाले. भारतासाठी यश राठौडने सर्वाधिक 44 धावा केल्या, तर देवदत्त पड्डिकल 32 धावा करत दुसरा सर्वाधिक मोठा स्कोरर राहिला.

न्यूझीलंडकडे 204 धावांची आघाडी

न्यूझीलंडचा कर्णधार राइस मारिउच्या 76 धावा आणि डिन फॉक्सक्रॉफ्टच्या 51 धावांच्या मदतीने पहिल्या डावात 317 धावा करत त्यांनी भारतीय संघावर 204 धावांची आघाडी घेतली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 516 धावांची मोठाली धावसंख्या उभारली.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या देवदत्त पड्डिकलने 248 चेंडूंत 24 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 199 धावा रचल्या. पड्डिकल अवघ्या एका धावेमुळे द्विशतकापासून मुकला. त्याशिवाय साई सुदर्शन ही शतकापासून हुकला. सुदर्शनने 184 चेंडूंत 12 चौकारच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. यश राठौडने 66 आणि वॉशिंग्टन सुंदरने 52 धावांची खेळी केली.

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात

न्यूझीलंडसमोर 313 धावांचे लक्ष्य

न्यूझीलंड ‘ए’ने पहिल्या डावात 204 धावा केल्या होत्या, त्यामुळे विजयासाठी त्यांना 313 धावांचे लक्ष्य मिळाले. पण किवी संघाचा दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने आपले 9 विकेट 187 धावांत गमावले. सामन्याचा एक तासांचा खेळ शिल्लक होता. पण खराब प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. अखेर हा सामना ड्रॉच्या रुपात समाप्त झाला. या निर्णयाचा भारतीय संघाला धक्का बसला, कारण हातात आलेला सामना ते जिंकू शकले नाहीत.

Ballon d’Or : किंग कोहलीने हॅरी केनला दिल्या शुभेच्छा, म्हणाला, तू या सन्मानाचे हक्कदार!

भारतासाठी चिंतेची बाब अशी की, स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि के. एल. राहुल ही सलामी जोडी दोन्ही डावांत फ्लॉप राहिली. जयस्वालने पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्या, तर राहुल पहिल्या डावात भोपळाही फोडू शकला नाही. दुसऱ्या डावात त्याने फक्त 4 धावांचे योगदान दिले. राहुल आणि जयस्वालला भारतीय सीनियर टीमसाठी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत डावाची सुरुवात करायची आहे.

Web Title: Ind a vs nz a match drawn bad light one wicket away rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • k l rahul
  • New Zealand
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

NZ A Vs IND A: ‘न्यूझीलंड ए’ ने ‘इंडिया ए’चे उडवले तीन तेरा; KL Rahul अन् ‘हा’खेळाडू फ्लॉप, 95 वर…
1

NZ A Vs IND A: ‘न्यूझीलंड ए’ ने ‘इंडिया ए’चे उडवले तीन तेरा; KL Rahul अन् ‘हा’खेळाडू फ्लॉप, 95 वर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.