
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Suryavanshi and Ali Raza had a heated argument during the match : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काल झालेल्या अंडर 19 आशिया कप 2025 च्या फायनलच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट शांत राहिली. १४ वर्षीय या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध दमदार पदार्पण केले, परंतु १० चेंडूत २६ धावा काढल्यानंतर त्याची विकेट गेली. यावेळी त्याला जीवनदान देखील मिळाले होते.
पण, तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना असल्यावर वाद होणार हे फार कमी वेळा पाहायला मिळाले आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वैभव सूर्यवंशी हा बाद झाल्यानंतर वैभव आणि पाकिस्तानी गोलंदाज अली रझा यांच्यात जोरदार वाद झाला. रझाच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे वैभव अस्वस्थ झाला आणि त्याने मैदानाच्या मध्यभागी आपला राग व्यक्त केला.
खरंतर, वैभवने त्याच्या डावाची सुरुवात धमाकेदार पद्धतीने केली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात २१ धावा फटकावल्या. १० चेंडूत २६ धावा काढल्यानंतर, त्याने अली रझाविरुद्ध मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू जोरदार धार घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला. वैभवला बाद केल्यानंतर अली रझा आक्रमकपणे साजरा करताना दिसला..
रझा पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या वैभवलाही काहीतरी बोलला, ज्यामुळे १४ वर्षीय फलंदाज अचानक संतापला. वैभव मागे वळून रझाला काहीतरी म्हणाला, नंतर जमिनीकडे हात दाखवला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Vaibhav Suryavanshi just following his seniors 💀#INDvsPAK pic.twitter.com/Y7BqLmhc6D — Sarcasm (@sarcastic_us) December 21, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. हमजा झहूर फक्त १८ धावांवर बाद झाला. तथापि, समीरने उस्मान खानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. उस्मान ३५ धावांवर बाद झाला. समीरने एका टोकापासून आपली स्फोटक फलंदाजी सुरू ठेवली आणि २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
अर्धशतक झळकावल्यानंतर, समीरने त्याची प्रभावी फलंदाजी सुरू ठेवली, दुसऱ्या टोकावरील अहमद हुसेनकडून त्याला उत्कृष्ट साथ मिळाली. समीरने ७१ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. शानदार फलंदाजी करताना, समीरने ११३ चेंडूत १७२ धावांची शानदार खेळी केली. समीरच्या उत्कृष्ट खेळीमुळे, पाकिस्तानने १९ वर्षांखालील आशिया कपच्या इतिहासातील सर्वोच्च अंतिम धावसंख्या नोंदवण्यात यश मिळवले.