Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 3rd T20 : टिम डेव्हिडचा भारताविरुद्ध चमत्कार! टी-२० सामन्यात लगावला सर्वात लांब षटकार; पहा Video

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज टीम डेव्हिडने सर्वात लांब षटकार मारला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 02, 2025 | 06:57 PM
IND vs AUS 3rd T20: Tim David's miracle against India! Hits the longest six in a T20 match; Watch Video

IND vs AUS 3rd T20: Tim David's miracle against India! Hits the longest six in a T20 match; Watch Video

Follow Us
Follow Us:

Tim David hits the longest six in a T20 match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला आहे.  बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य गाठून ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात  टिम डेव्हिडने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांची बरसात करत   केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावांची स्फोटक खेळी केली. यादरम्यान, त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार मारून एक नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : होबार्टमध्ये भारताचा ‘सुंदर’ विजय; ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत

टिम डेव्हिडने टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार मारला

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सातव्या षटकात, टिम डेव्हिडने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एक ऐतिहासिक षटकार खेचला आहे. त्याने अक्षर पटेलच्या पूर्ण लांबीच्या चेंडूवर एक शक्तिशाली फटका मारला, जो थेट स्टेडियमच्या छताच्यावरुन गेला आणि बाहेर गेला. जेव्हा या षटकाराची लांबी मोजली गेली तेव्हा त्याची लांबी १२९ मीटर इतकी भरली. ज्यामुळे तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार ठरला आहे. हा षटकार केवळ टी२० क्रिकेटमधील सर्वात लांबच नव्हता तर भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार देखील  होता. या शॉटसह डेव्हिडने त्याचाच कर्णधार मिचेल मार्शचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने यापूर्वी १२४ मीटरचा षटकार खेचला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार

    • कसोटी क्रिकेट : ब्रेट ली (१४३ मीटर) विरुद्ध वेस्ट इंडिज, २००५
    • एकदिवसीय क्रिकेट : शाहिद आफ्रिदी (१५३ मीटर) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१३
    • टी२० क्रिकेट : टिम डेव्हिड (१२९ मीटर) विरुद्ध भारत, २०२५

टिम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी तारणहार,पण सामना गमावला

टिम डेव्हिडची खेळी केवळ विक्रम मोडणारीच नव्हती तर ऑस्ट्रेलियासाठी सामना बदलणारी देखील ठरली. तो फलंदाजीसाठी आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या स्कोअर बोर्डवर फक्त १४ धावा लागल्या होत्या. संघ अडचणीत असताना डेव्हिडने आक्रमक फलंदाजी केली आणि भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावांची स्फोटक खेळी केली. परंतु, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि परिणामी डेव्हिडची खेळी व्यर्थ गेली.

हेही वाचा : IND-A vs SA-A: भारतापुढे दक्षिण आफ्रिकाची शरणागती! कर्णधार ऋषभ पंतची विजयी फटकेबाजी

 

Web Title: Ind vs aus 3rd t20 tim david hits longest six in t20i against india watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • T20 cricket
  • Tim David

संबंधित बातम्या

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल
1

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल

Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार
2

Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
3

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.