
IND vs AUS 4th T20I: India's 'beautiful' performance in Gold Coast! Kangaroos defeated by 48 runs; take lead in the series
India wins in IND vs AUS 4th T20I match : गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला १८.२ ओव्हरमध्ये सर्वबाद ११९ धावांवर रोखले. परिणामी भारताने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी पराभूत केले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
हेही वाचा : WPL 2026 : RCB मध्ये बदलाला सुरुवात! मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक; सहा वर्षे सपोर्ट स्टाफचा भाग
चौथ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ४६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्यांची सुरवात शानदार झाली नाही. ५ व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला ३७ धावांवर मॅथ्यू शॉर्टच्या रूपात पहिला झटका बसला. त्याला २५ धावांवर अक्षर पटेलने माघारी पाठवले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स जात राहिल्या.
ऑस्ट्रेलियाकडून केवळ शॉन मार्शने सर्वाधिक ३० धावा केल्या. इतर फलंदाज मात्र मैदानावर टिकू शकले नाहीत. मिशेल मार्श ३० धावा, जोश इंग्लिस १२ धावा, टिम डेव्हिड १४ धावा, जोश फिलिप १० धावा, मार्कस स्टोइनिस १७ धावा, ग्लेन मॅक्सवेल २ धावा, बेन द्वारशीस ५, झेवियर बार्टलेट ० धावा, अॅडम झांपा ० धावा करून बाद जाहले तर नॅथन एलिस २ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने १.२ ओव्हरमध्ये केवळ ३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Washington Sundar wraps things up in style 👌 A terrific performance from #TeamIndia as they win the 4⃣th T20I by 4⃣8⃣ runs. 👏👏 They now have a 2⃣-1⃣ lead in the #AUSvIND T20I series with 1⃣ match to play. 🙌 Scorecard ▶ https://t.co/OYJNZ57GLX pic.twitter.com/QLh2SRqW9U — BCCI (@BCCI) November 6, 2025
हेही वाचा : मोठी बातमी! सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झांपा.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
बातमी अपडेट होत आहे..