Mohammed Shami did wonders Gave Bengal a Thrilling Victory
IND vs AUS 4th Test : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला BCCI द्वार अनफिट घोषित करीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दूर केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करीत बंगाल क्रिकेट संघाला विजय मिळवून दिले होते. तरीही त्याला अनफीट ठरवल्याने ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे.
बीसीसीआयने काय म्हटले वाचा
BCCI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात मोहम्मद शमीने बंगालसाठी 43 षटके टाकली. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने बंगालसाठी सर्व 9 सामने खेळले. याशिवाय त्याने बंगालसाठी 43 षटकेही टाकली. सराव सत्रात त्याने खूप गोलंदाजीचा सराव केला जेणेकरून तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांसाठी स्वत:ला तयार करू शकेल. परंतु, दुर्दैव हे की त्याच्या डाव्या गुडघ्याला सूज आली आहे. जे खूप लांब ब्रेकनंतर गोलंदाजीवर जास्त कामाचा बोजा घेतल्याने झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात ठरला महागडा खेळाडू
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा पहिला उपांत्यपूर्व सामना बडोदा आणि बंगालच्या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात बडोदा संघाने 41 धावांनी विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पराभवाला सामोरे जावे लागले. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळत आहे, जेणेकरून तो टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करू शकणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा शमीवर खिळल्या होत्या. BCCI ही शमीच्या फिटनेसवर बारीक लक्ष देत आहे. शमीला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नसला तरी त्याने मोठी कामगिरी केली.
टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण
बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळताना मोहम्मद शमीने 4 षटकांत 43 धावा दिल्या, म्हणजेच तो खूप महागडा ठरला. मात्र, या काळात त्याने 2 बळीही घेतले. या दोन विकेट्ससह शमीने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्सही पूर्ण केल्या. आम्ही तुम्हाला सांगतो, टी-20 क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून 200 विकेट घेणारा शमी हा 8वा भारतीय आहे. शमीपूर्वी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग आणि उमेश यादव यांनी ही कामगिरी केली आहे.
दुखापतीत सुधारणा न झाल्याने बाहेर
भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. यामध्ये आतापर्यत भारताच्या संघाने तीन सामने खेळले आहेत या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी आहे. तर एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. त्याआधी जर बोलायचं झालं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या संघाची घोषणा जेव्हा करण्यात आली होती तेव्हा मोहम्मद शामीचे नाव यादीमध्ये नसल्यामुळे चाहते निराश झाले होते, त्यानंतर सांगण्यात आले होते की, मोहम्मद शामी पूर्णपणे दुखापतीमधून सुधारणा न झाल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. आता सध्या शमी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे आणि त्यामध्ये तो सध्या कमालीची कामगिरी करत आहे. यांचदरम्यान आता उद्यापासून म्हणजेच २१ डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु होणार आहेत.
मोहम्मद शमीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने शामी विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे. बंगालचा संघ आपला पहिला सामना शनिवारी २१ डिसेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. अलीकडेच रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली T२० ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद शामी आता दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत तो सहभागी होऊ शकणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.