फोटो सौजन्य - बीसीसीआय
IND W vs PAK W हवामान अहवाल: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताच्या संघाने श्रीलंकेचा पराभव करुन पहिला विश्वचषकाचा विजय नोंदवला आहे. दुसरा सामना भारताचा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भव्य सामना ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.
चाहते पुन्हा एकदा क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघांचा सामना पाहतील. यापूर्वी, २८ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते आणि टीम इंडियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून जेतेपद पटकावले होते. आता, टीम इंडिया पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, २०२५ च्या विश्वचषकातील या सहाव्या सामन्यावर पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे सामना रद्द होऊ शकतो. काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणार सामना हा रद्द करण्यात आला.
AccuWeather च्या मते, आज सकाळी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसजसा वेळ पुढे जाईल तसतसे पावसाची शक्यता कमी होईल. सकाळी ११ वाजता पावसाची शक्यता ७० टक्के असली तरी, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ती फक्त २० टक्के राहील. यामुळे सुरुवातीस थोडा विलंब होऊ शकतो, परंतु पावसामुळे रद्द होण्याची शक्यता कमी आहे.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ४ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु, पावसामुळे नाणेफेकही झाली नाही, परिणामी सामना नाणेफेक न करता रद्द करण्यात आला. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला १-१ असा विजय मिळाला.
Two crucial #CWC25 points up for your grabs today in Colombo 🏏 All the broadcast details for #INDvPAK are available here 📺 https://t.co/3BqKJPeYJB pic.twitter.com/uOeSF0I7MV — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2025
या स्पर्धेतील टीम इंडियाचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होता. या सामन्यात भारतीय संघाने डीएसएस पद्धतीने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. दुसरीकडे, पाकिस्ताननेही आतापर्यंत एक सामना खेळला आहे. २ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी झाला आणि या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. आता, पाकिस्तान आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.