
IND vs AUS 5th T20: Rain washes out final T20 match! India wins series 2-1 against Australia
Fifth T20 match called off due to rain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज गाब्बा येथे पाचवा टी२० सामना खेळवण्यात आला होता, परंतु या संन्याला खराब हवामानाचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला परिणामी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ अशी मालिका खिशात घातली. त्याआधी गाब्बा येथे मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच होती. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने ब्रिस्बेनमधील गाब्बा येथे पुन्हा एकदा नाणेफेकिचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतर;आया आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले.
हेही वाचा : Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना
प्रथम फलंदाजीसाठी उतरणाऱ्या भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय सलामीवीरांनी भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने 13 चेंडूचा सामना करत नाबाद 23 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 षटकार आणि 1 चौकार लगावले. तर गिलने 16 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या आहेत. त्यांनी मिळून 4.5 षटकात 52 धावांची भागीदारी केली. यादरम्यान पावसाच्या हजेरी खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर पावसाचा जोर ओसरलाच नाही.
🚨 The 5th T20I has been called off due to rain.#TeamIndia win the series 2-1 🏆 Scorecard ▶️ https://t.co/V6p4wdCkz1#AUSvIND pic.twitter.com/g6dW5wz1Ci — BCCI (@BCCI) November 8, 2025
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाब्बा येथे होणारा पाचवा टी२० सामना खराब हवामान आणि विजांच्या कडकडाटामुळे थांबवण्यात आला. खेळ थांबण्याच्या वेळी, भारताने ४.५ षटकांत एकही विकेट न गमावता ५२ धावा जोडल्या होत्या. परंतु खेळाडूंना मैदान सोडावे लागले. स्टेडियमच्या स्कोअरबोर्डवर खराब हवामानाचा इशारा दिलेला होता. तसेच हवामान खात्याने असे देखील सूचित केले आहे की स्टेडियममध्ये एक तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता जास्त असण्याची शक्यता आहे. अखेर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आयाला. परिणामी भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. माळीकविर म्हणून अभिषेक शर्माची निवड करण्यात आली.
भारत : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नाथन एलिस आणि अॅडम झांपा.