फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना शिल्लक आहे. या सामन्याची सुरुवात ३ जानेवारीपासून होणार आहे. यासाठी आता दोन्ही संघाची प्लेइंग ११ कशी असणार आहे याकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये एक बदल पक्का झाला आहे. तो म्हणजेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे संघाबाहेर असणार आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे यावर एकदा नजर टाका
तस्मानियाचा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरला ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ५व्या कसोटीत संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शच्या जागी वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे. मार्शची फलंदाजीतील खराब कामगिरी आणि गोलंदाजीत कमी योगदान यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. कर्णधार पॅट कमिन्सने कसोटीपूर्वी जाहीर केले की, वेबस्टर ऑस्ट्रेलियासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला दशकभरानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
🚨 MITCHELL MARSH DROPPED FOR THE SCG TEST AGAINST INDIA 🚨 Australia 11: Konstas, Khawaja, Labuschagne, Smith, Head, Webster, Carey, Cummins, Starc, Lyon, Boland BEAU WEBSTER WILL BE MAKING HIS DEBUT FOR AUSTRALIA TOMORROW…!!! pic.twitter.com/SC0iuQ4i9O — Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2025
बीउ वेबस्टरने २०१४ मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले. आता वयाच्या ३१ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन संघात एखादा खेळाडू पदार्पण करत असतानाचा हा सलग दुसरा सामना असेल. तत्पूर्वी, सलामीवीर सॅम कॉन्स्टासने बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केले आणि आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ब्यू वेबस्टरने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धा शेफिल्ड शिल्डमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात, त्याने असा पराक्रम केला जो वेस्ट इंडिजचा दिग्गज गारफिल्ड सोबर्स नंतर कोणीही करू शकला नाही. वेबस्टरने ९०० हून अधिक धावा केल्या आणि ३० हून अधिक बळी घेतले. त्याने ५८.६२ च्या सरासरीने ९३८ धावा केल्या आणि २९.३० च्या सरासरीने ३० विकेट घेतल्या.
IND vs AUS : कशी असेल भारताची प्लेइंग ११, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
ब्यू वेबस्टरने आतापर्यंत ९३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३७.८३ च्या सरासरीने ५२९७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने गोलंदाजीत 148 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३१७ धावा केल्या आहेत आणि ४४ विकेट्स घेतल्या आहेत. T२० मध्ये त्याच्या नावावर १७०० धावा आणि २४ विकेट आहेत. बो वेबस्टरसाठी ही संधी त्याच्या उत्कृष्ट घरगुती विक्रमासाठी बक्षीस आहे.