भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्याला सुरुवात व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भारताच्या संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. आज भारताचे कोच गौतम गंभीर यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी भारतीय संघाच्या सिडनी कसोटीच्या संदर्भात महत्वाच्या अपडेट दिल्या आहेत यावर एकदा नजर टाका. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहेत. शेवटच्या कसोटीमध्ये ते कशी कामगिरी करतील यावर नजर असणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात खेळवण्यात आले यावेळी त्याने कमालीची कामगिरी केली पण मागील दोन सामन्यांमध्ये त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यामुळे तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आता तो कोणत्या क्रमांकावर सिडनीमध्ये खेळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुष्टी केली आहे की, वेगवान गोलंदाज आकाशदीप पाठीच्या दुखण्यामुळे शुक्रवारपासून सिडनी येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीतून बाहेर पडला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मागील सामन्यांमध्ये शुभमन गिलला संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे शेवटच्या आणि पाचव्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते परंतु त्याच्या जागेवर कोणाला बाहेर काढले जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये आहे, त्याने संघासाठी फार चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे आता सिडनीमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात तो कशाप्रकारे कामगिरी करेल यावर चाहत्यांची नजर असणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताच्या संघाच्या फलंदाजीवर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. त्यामुळे आता शेवटचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आता सामन्यावर प्रेक्षकांची नजर असणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया