'I have Rohit bhai's patience...', what lesson did captain Shubman Gill learn from the hitman? Read in detail
Shubman Gill’s big statement about Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मलिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या वेळी संघाची धुरा रोहित शर्मा नाही तर शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. अशातच नवनियुक्त एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल पत्रकार परिषदेला सामोरा गेला आहे. त्याने रोहित शर्माबाबत मोठे विधान केले असून ते सद्या चर्चेत आहे.
भारताचा नवनियुक्त एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलला की, या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो जेव्हा त्याच्या पूर्वसुरी रोहित शर्माप्रमाणे एकदिवसीय फॉर्मेटची सूत्रे हाती घेईल तेव्हा तो भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये शांत वातावरण राखण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा शुभमन गिल १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतून त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदाची सुरुवात करणार आहे.
यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसाच्या संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिलकडे संगहचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कसोटी संघाचे नेतृत्व करणारा गिल एकदिवसीय संघाची धुरा कशी वाहतो ही बघणे रंजक असणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य
१० ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी सुरू होणार आहे. शुभमन गिलला जेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याच्या विस्तारित भूमिकेबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, “मला रोहित भाईचा संयम आणि संघात त्याने निर्माण केलेल्या मैत्रीचे आत्मसात करायचे आहे.” अशी भूमिका शुभमन गिलने मांडली. तसेच शुभमन गिलने रोहित आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या भविष्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम देण्याचा देखील प्रयत्न केला आहे, रोहित आणि विराट हे दोघेही आता फक्त एकदिवसीय स्वरूपात उपलब्ध असणार आहेत. त्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गिल पुढे म्हणाला की, “या दोघांनी भारतासाठी अनेक सामने जिंकले असून त्यांच्यासारखे कौशल्य आणि अनुभव फार कमी लोकांकडे आहे. आम्हाला त्यांची खूप गरज आहे.”
हेही वाचा : IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक) आणि यशस्वी जयस्वाल.