शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill’s comments on Virat Kohli and Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयम खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत तयारी करत असून तो केवळ ही मलिका २-० विजयावर लक्ष केंद्रित नसून ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि त्याचा पूर्वसुरी रोहित शर्मा यांच्या भूमिकांवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार आहेत. या दोघांवर शुभमन गिलने भाष्य केले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ही मालिका विराट आणि रोहितची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. रोहित शर्माने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमावले असले तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकदिवसीय संघात समाविष्ट करण्याचा निवडकर्त्यांचा निर्णय चाहत्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.
हेही वाचा : गोल्डन बॉय करणार पुनरागमन! नीरज चोप्रा स्वीस व्हॅलीजमध्ये नव्या हंगामासाठी गाळतोय घाम
कसोटी कर्णधार शुभमन गिल पत्रकार परिषदेला सामोरा गेला तेव्हा त्याला रोहीत आणि विराटबद्दल विचारण्यात आले. तेव्हा नवीन कर्णधार शुभमन गिलने दोन्ही खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या उपस्थितीचा अर्थ काय आहे हे शुभमन गिलने यावेळी उघड केले आहे. गिल म्हणाला की, “दोघेही अत्यंत अनुभवी असून त्यांनी भारतासाठी अनेक सामने जिंकलेले आहेत. त्यांच्यातील कौशल्याने, गुणवत्तेने आणि अनुभवाने खूप कमी खेळाडू आहेत.” मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसमोरील आव्हान देखील कमी नाही. गंभीरसमोर भारतीय संघाला संक्रमण आणि टॉप गियरमध्ये, एकाच वेळी तिन्ही स्वरूपात ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकदिवसीय सामन्यांत खेळताना दिसणार आहेत. २०२७ च्या विश्वचषकात ही जोडी नेमकी कशी भूमिका निभावतील याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून आहे. भारत २०२७ च्या विश्वचषक चक्र आणि पुढील वर्षीच्या टी-२० विश्वचषकासाठी आपले नियोजन आखत आहेत. सर्व खेळाडूंची तंदुरुस्ती, कौशल्ये आणि मनोबल उच्च पातळीवर राहील याची खात्री करण्यासाठी संघ व्यवस्थापन देखील सजग असून त्यासाठी प्रयत्न करत आहे.अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्यावर टीम इंडियाला यापूर्वी देखील संक्रमणांमधून जावे लागले आहे.