IND VS AUS 1st ODI: "Don't expect victory...", former legend Lalelal after defeat in Perth; questions captain Gill
Mohammad Kaif angry with Team India : रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया(IND VS AUS) आणि भारत यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. शुभमन गिलसाठी एकदिवसीय कर्णधार म्हणून हा सामना खराब ठरला. त्याच्या बॅटने चांगली कामगिरी केली नाही आणि त्याच्या कर्णधारपदाचा देखील तो प्रभाव पाडू शकला नाही. संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा प्रश्न कुलदीप यादवला संघाचा भाग न बनवणे. याबाबत आता भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने संघाला फटकारले आहे.
हेही वाचा : Women World Cup 2025 : “मला आशा होती, भारत…”, इंग्लंडविरुद्ध पराभव जिव्हारी; स्मृती मानधनाने व्यक्त केली खंत
मोहम्मद कैफने भारतीय संघाला सुनावले
भारतीय संघाच्या पराभवानंतर, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर खेळाडूंवर निशाणा साधला. त्याने पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरताना म्हटले की, “या संघात खूप जास्त अर्धवेळ गोलंदाज असून नितीश रेड्डी हा पूर्ण गोलंदाज नाही आणि सुंदर देखील या खेळपट्टीवर आपला प्रभाव पाडू शकला नाही. हर्षित राणा स्वतःवर निराश होईल. कमी धावसंख्या असताना देखील गोलंदाजांना सामना फिरवण्याची संधी होती, पण ते कधी जबाबदारी घेतील? बुमराह आणि शमीच्या कामगिरीवर आधारित विजयाची अपेक्षा आता करता येत नाही.” कैफच्या विधानावरून हे स्पष्ट झाले की भारताचा पराभव केवळ फलंदाजांनी न केलेल्या फलंदाजीमुळे नाही तर गोलंदाजीच्या अपयशामुळे देखील झाला आहे.
मोहम्मद कैफने कर्णधार शुभमन गिलच्या निर्णयांवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तो म्हणाला की, “शुभमन गिलचा कर्णधार म्हणून एक कसोटी सामना होता. त्याने कुलदीप यादवला खेळवले नाही, जो विकेट घेणारा गोलंदाज आहे. तुम्ही प्रत्येक बेस कव्हर करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सर्वात महत्वाची गोष्ट चुकवली. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि कुलदीपच्या अनुपस्थितीमुळे मी खूप निराश झालो आहे. भारतीय संघाने गुणवत्तेपेक्षा संख्येला अधिक प्राधान्य दिले.”
पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला फक्त २६ षटकांत ९ बाद १३६ धावाच करता आल्या. वरचा क्रम पूर्णपणे कोसळलेला दिसून आला. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे सर्व दिग्गज खेळाडू अपयशी ठरले. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले पण संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत त्यांना पोहचवता आले नाही. गोलंदाजीमध्ये देखील अशीच स्थिती दिसून आली. मिशेल मार्श (नाबाद ४६) आणि जोश फिलिप (३७) यांच्या खेळीच्या मदतीने कांगारूंनी केवळ २१.३ षटकांत सहज लक्ष्य गाठले.
हेही वाचा : IND vs AUS : भारताविरुद्ध ओकली आग! गिल आर्मीला दिले दोन धक्के, ‘या’ खेळाडूला अॅशेस मालिकेत खेळायची इच्छा