Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या पराभवाने अजिंक्य रहाणेकडून नराजी व्यक्त करण्यात आली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 19, 2026 | 04:02 PM
IND vs NZ: 'There were mistakes in his fielding...', Ajinkya Rahane expresses displeasure with captain Gill after India's defeat.

IND vs NZ: 'There were mistakes in his fielding...', Ajinkya Rahane expresses displeasure with captain Gill after India's defeat.

Follow Us
Close
Follow Us:

Ajinkya Rahane’s comments about Shubman Gill : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातरविवारी इंदूरमध्ये तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सच्या शतकांच्या जोरावर  भारताविरुद्ध ३३८ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात भारताला ४६ षटकात सर्वबाद २९६ धावाच करता आल्या होत्या. परिणामी भारताने ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  या पराभवावर भारताचा फलंदाज अजिंक्य राहणेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याने कर्णधार शुभमन गिलच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. अर्शदीप आणि हर्षित राणा यांनी पहिल्या सात चेंडूत दोन्ही किवी सलामीवीरांना माघारी पाठवले.तथापि, त्यानंतर भारत पाहुण्यांवर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला. डॅरिल मिशेल आणि फिलिप्स यांनी चौथ्या विकेटसाठी २१९ धावांची मोठी भागीदारी केली. मधल्या षटकांमध्ये कर्णधार गिलच्या रणनीतीवर टीका करताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, “त्याने क्षेत्ररक्षणात चुका केल्या होत्या. विशेष म्हणजे, भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी फक्त सहा षटकेच टाकली, तर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांनी आठ षटके टाकली, जरी तो एकही बळी घेता आला नाही.”

हेही वाचा : बांगलादेशच्या नावाखाली पाकिस्तानने घातला गोंधळ, T20 World Cup 2026 मध्ये सहभागी न होण्याची दिली धमकी

रहाणेकडून गिलच्या रणणीतीवर प्रश्नचिन्ह

भारताच्या पराभवानंतर क्रिकबझशी संवाद साधताना अजिंक्य रहाणे म्हणाला की,  “वैयक्तिकरित्या, मला वाटते की शुभमनने कुलदीपला मधल्या षटकांमध्ये फक्त तीन षटके देऊन आणि नंतर ३७ व्या-३८ व्या षटकापर्यंत वाट पाहण्याची चूक केली, जडेजाला देखील ३० व्या षटकापर्यंत थांबून ठेवण्यात आले. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. इथेच भारताकडून चूक झाली.”

अनुभवी भारतीय जलदगती गोलंदाज झहीर खानने रहाणेच्या मुद्द्याला समर्थन देत म्हटले की, “जडेजाला विशेषतः प्रथम गोलंदाजी करू द्यायला हवी होती.” झहीर खान पुढे म्हणाला की, “कुलदीपपेक्षा, समस्या रवींद्र जडेजाला गोलंदाजी करण्यासाठी खूप उशिरा आणण्याची होती. कदाचित त्यांचा हेतू नितीश रेड्डीला सामन्याच्या परिस्थितीनुसार थोडा जास्त वेळ आणि षटके देण्याचा राहिला होता, परंतु यामुळे तुमचे पर्याय मर्यादित होऊन जातात. ”

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘वानखेडे स्टेडियमवर खेळणे भावनिक….’, ‘या’ भारतीय वंशाच्या अमेरिकन गोलंदाजाचे विधान

जडेजा आणि कुलदीप यादवची सुमार कामगिरी

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवसाठी निराशाजनक राहिली. दोन्ही गोलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. कुलदीप यादवने तीन सामन्यांमध्ये ६०.६७ च्या सरासरीने २५.० षटके गोलंदाजी केली. कुलदीप यादवला ७.२८ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटसह फक्त तीन विकेट्स चटकावता आल्या. रविवारी जडेजाने सहा षटकांत ४१ धावा मोजल्या. वडोदरा येथील पहिल्या सामन्यात त्याने नऊ षटकांत ५६ धावा दिल्या होत्या, तर राजकोट येथे त्याने आठ षटकांत ४४ धावा दिल्या. या मालिकेत जडेजाला एक देखील विकेट काढता आलेली नाही.

Web Title: Ind vs nz ajinkya rahane expresses displeasure with captain gills strategy after indias defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IND vs NZ
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…
1

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…

आता या स्पर्धेत दिसतील शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा, 22 जानेवारी रोजी उतरणार मैदानात
2

आता या स्पर्धेत दिसतील शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा, 22 जानेवारी रोजी उतरणार मैदानात

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर
3

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral
4

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.