
शुभमन गिलच्या नेतृत्वावर माजी पाक खेळांडूची जहरी टीका; थेट बाबर आझमशी केली तुलना (Photo Credit- X)
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने शुभमन गिलच्या मैदानातील रणनीतीवर सडकून टीका केली. तो म्हणाला, या मालिकेत गिलने पाकिस्तानच्या शान मसूदसारखे कर्णधारपद भूषवले आहे. एका कर्णधाराने मैदानाबाहेरून येणाऱ्या संदेशांकडे सतत लक्ष देऊ नये, त्याने स्वतःचे डोकं वापरलं पाहिजे. मी तर त्याला सांगेन की, आधी शाळेत जा आणि तिथे कर्णधारपदाचे धडे गिरवून ये.
Kamran Akmal “Shubman Gill’s mind doesn’t seem to be working in captaincy,He shouldn’t go by messages being conveyed from outside.I would tell him: go to school and learn captaincy.” pic.twitter.com/CI0JrpmEPP — Sujeet Suman (@sujeetsuman1991) January 19, 2026
IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल याने गिलच्या निर्णयांवर ताशेरे ओढताना त्याची तुलना पाकिस्तानच्या बाबर आझमशी केली. अकमल म्हणाला, कर्णधार म्हणून मैदानात असताना गिलचा मेंदू नीट काम करत नाहीये असं वाटतं. २०१८ मध्ये बाबर आझमला कर्णधारपदी नियुक्त करून पाकिस्तानने जी चूक केली होती, तीच चूक भारत आता गिलच्या बाबतीत करत आहे.”
अकमलने पुढे तांत्रिक चुकांवर बोट ठेवताना विचारले की, जेव्हा न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जयडेन लेनोक्स गोलंदाजी करत होता, तेव्हा गिलने विराट कोहलीसोबत उजव्या हाताच्या फलंदाजाला का पाठवले? गौतम गंभीर नेहमी डावखुऱ्या फलंदाजांना प्राधान्य देतो, मग नितीश कुमार रेड्डीच्या आधी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी का पाठवले नाही? तुमच्याकडे मधल्या फळीत डावखुरा फलंदाज उपलब्ध असताना त्याचा योग्य वापर का केला गेला नाही?”
भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात अतिशय प्रभावीपणे केली होती. पहिला सामना जिंकून भारताने विजयी सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडने जबरदस्त पुनरागमन केले. कीवी संघाने दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आणि निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताचा धुव्वा उडवत मालिका २-१ ने खिशात घातली. या पराभवामुळे भारतीय संघ निवडीवर आणि भविष्यात शुभमन गिलला कर्णधार म्हणून कायम ठेवायचे की नाही, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.