फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक अतिशय रोमांचक सामना झाला. स्टीव्ह स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये ४७४ धावांची मोठी धावसंख्या उभारली, तर रोहित शर्मा या दौऱ्यावर प्रथमच सलामीवीर म्हणून आला आणि तो अपयशी ठरला. आतापर्यंत तो सहाव्या क्रमांकावर खेळत होता आणि तिथेही त्याला धावा करता आल्या नाहीत. यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतक पूर्ण केले, मात्र तो धावबाद झाला. यशस्वी जैस्वालने संघासाठी ८२ धावांची खेळी खेळली.
विराट कोहली आज लयीत दिसला, पण यशस्वी बाद झाल्यानंतर त्याचे लक्ष तुटले आणि चौथ्या-पाचव्या स्टंपच्या चेंडूवर तो पुन्हा झेलबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या १६४/५ अशी आहे. अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे, पहिल्या डावाच्या आधारे भारत अजूनही ३१० धावांनी मागे आहे आणि फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला अजूनही १११ धावांची गरज आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ३११/६ अशी आघाडी घेतली आणि १४० हून अधिक धावा जोडल्या. आतापर्यंत पहिल्या सत्रात एकच विकेट पडली होती, मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित तीन विकेट पडल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथने १४० धावा केल्या, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकांसह ४७४ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या.
Stumps on Day 2 in Melbourne!#TeamIndia move to 164/5, trail by 310 runs
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#AUSvIND pic.twitter.com/9ZADNv5SZf
— BCCI (@BCCI) December 27, 2024
भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा रोहित शर्मा सलामीवीर म्हणून दिसला. मात्र, तो अवघ्या ३ धावा करून बाद झाला. यानंतर केएल राहुल सलामीवीर यशस्वी जैस्वालला पाठिंबा देण्यासाठी आला. दोघांमध्ये भागीदारी बहरली, मात्र चहापानाच्या विश्रांतीपूर्वी शेवटच्या चेंडूवर ते क्लीन बोल्ड झाले. यानंतर तिसऱ्या सत्रात विराट कोहली यशस्वीला साथ देण्यासाठी क्रीजवर आला. दोघांमध्ये १०० धावांची भागीदारी झाली होती, मात्र यशस्वी ८२ धावा करून धावबाद झाला. विराट कोहलीही ३६ धावा करून झेलबाद झाला. भारताची दिवसातील शेवटची विकेट आकाश दीपच्या रूपाने पडली. आता सध्या भारताच्या संघाच्या तिसऱ्या दिनाची सुरुवात रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा करणार आहेत. दुसऱ्या दिनाच्या शेवटी ६ धावा केल्या आहेत तर जडेजाने ४ धावा केल्या आहेत.