Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : बूम बूम बुमराह… मारला विकेटचा चौकार, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची जादू दाखवली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या चार गोलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2024 | 09:33 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बुमराहच्या गोलंदाजीने केली कमाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे, या सामन्याचा आज चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या सामन्याची दमदार सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घाम गाळला होता. त्यानंतर आता भारताचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीने टीम इंडियाला संकातून बाहेर काढले आहे आणि भारताच्या संघाचे सामन्यात पुनरागमन केले आहे. नितीश कुमार रेड्डीने संघासाठी ११४ धावांची खेळी खेळली. आज सकाळी सामान्यांच्या चौथ्या दिनी भारताच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये ४७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या संघाने ३६९ धावा केल्या आहेत. तरीही ऑस्ट्रेलियाच्यास संघाकडे आघाडी आहे.

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची जादू दुसऱ्या इनिंगमध्ये दाखवली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या चार गोलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. यामध्ये सॅम कॉन्स्टास, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि अलेक्स कॅरी या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या या गोलंदाजीने भारताच्या संघाला हा सामना जिंकण्याचे चान्स आणखीनच वाढले आहेत. ऑस्ट्रेलियाच्यास संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये ९१ धावा करून सहा विकेट्स गमावले आहेत. त्यामुळे भारताच्या संघासाठी हे चांगले संकेत आहेत.

Jasprit Bumrah bowling heat here at the MCG! Live – https://t.co/MAHyB0FTsR… #AUSvIND pic.twitter.com/D0yVnvTWM9 — BCCI (@BCCI) December 29, 2024

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संघासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट्स घेतले आहेत. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्वाच्या फलंदाजांना बाहेर केले आहे. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ या दोन फलंदाजांना बाहेर केले आहे. स्टीव्ह स्मिथने पहिल्या इनिंगमध्ये १४० धावांची खेळी खेळली होती त्यामुळे या इनिंगमध्ये त्याचा विकेट घेणं फार गरजेचं होत.

पहिल्या डावात ४ विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावातही तितक्याच विकेट घेतल्या. या काळात त्याने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये २०० विकेट्सही पूर्ण केल्या. बुमराहने कसोटीत विकेटचे द्विशतक पूर्ण करून इतिहास रचला आहे. त्याने सर्वात कमी सरासरीने २०० बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये १९.३८ च्या सरासरीने २०२ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात २० पेक्षा कमी सरासरीने २०० बळींचा टप्पा गाठणारा तो पहिला गोलंदाज आहे. होय, बुमराहने या प्रकरणात माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली ॲम्ब्रोस या दिग्गज गोलंदाजांचा पराभव केला आहे.

जसप्रीत बुमराह हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने ४४ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे, ऑल ओव्हर रेकॉर्डबद्दल बोलायचे तर आर अश्विन ३९ सामन्यांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह सर्वात कमी चेंडूत २०० कसोटी बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस, डेल स्टेन आणि कागिसो रबाडा या महान खेळाडूंच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Ind vs aus jasprit bumrah shows the way out for australia legendary batsmen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 08:53 AM

Topics:  

  • cricket

संबंधित बातम्या

India vs England : योगायोग सलग तिसऱ्यांदा भिडणार भारत आणि इंग्लंड! कोणाला मिळणार अंतिम सामन्याचे तिकीट?
1

India vs England : योगायोग सलग तिसऱ्यांदा भिडणार भारत आणि इंग्लंड! कोणाला मिळणार अंतिम सामन्याचे तिकीट?

IND vs AFG : विश्वचषकानंतर भारताच्या संघासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, BCCI ने शेअर केले वेळापत्रक
2

IND vs AFG : विश्वचषकानंतर भारताच्या संघासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, BCCI ने शेअर केले वेळापत्रक

वर्ल्ड कपमध्ये प्लाॅप… आता बाबर आणि शाहीनवर PCB करणार कारवाई! पाकिस्तान बोर्डची झाली तयारी सुरू
3

वर्ल्ड कपमध्ये प्लाॅप… आता बाबर आणि शाहीनवर PCB करणार कारवाई! पाकिस्तान बोर्डची झाली तयारी सुरू

Sanju Samson : गंभीरची ‘जादूची झप्पी’ तर सुर्याचा ‘नमस्कार’… तुम्ही पाहिला का हा Viral Video, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
4

Sanju Samson : गंभीरची ‘जादूची झप्पी’ तर सुर्याचा ‘नमस्कार’… तुम्ही पाहिला का हा Viral Video, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.