Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत जम्मू-काश्मीरचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळला. भुते आणि गुरबानी यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. दुसरीकडे, कवलप्रीतने दमदार फलंदाजी केली; मात्र त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 19, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सुरुवातीच्या धक्क्यांनी जम्मू-काश्मीर अडचणीत
  • आघाडीसाठी विदर्भाच्या फलंदाजांकडे लक्ष
  • कवलप्रीतची झुंज; शतकाने हुलकावणी दिली
Nagpur News : रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत माजी विजेत्या जम्मू-काश्मीरचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळला. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एलिट गटातील सामन्याच्या पहिल्या दिवशी विदर्भाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. जम्मू-काश्मीरचा संघ ८२.५ षटकांत सर्वबाद झाला.

दिवसाचा खेळ संपला, तेव्हा विदर्भाच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली नव्हती. विदर्भाकडून नचिकेत भुते सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १६.५ षटकांत ४१ धावा देत ३ गडी बाद केले. रजनीश गुरबानीने १४ षटकांत ४१ धावा देत २ बळी घेतले. यश ठाकूरने १७ षटकांत ६३ धावा देत २ फलंदाजांना बाद केले. प्रफुल्ल हिंगे आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हर्षने १४ षटकांत ३९ धावा दिल्या.

मंदार महालेने किफायतशीर गोलंदाजी करत ९ षटकांत केवळ १६ धावा दिल्या.तीन बदल; मंदार महालेचे पदार्पण रणजी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यासाठी विदर्भाने अंतिम अकरामध्ये तीन बदल केले आहेत.मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या यश राठोडच्या जागी युवा अष्टपैलू मंदार महालेला संधी देण्यात आली आहे. मंदारचा हा पहिलाच प्रथम श्रेणी सामना आहे.

नामिबिया दौऱ्यात शानदार कामगिरी करून २५ वर्षीय मंदारने विदर्भक्रिकेट असोसिएशनच्या निवडकत्यांचे लक्ष वेधले होते. या दौऱ्यात तो विदर्भाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. मंदारशिवाय दर्शन नालकंडेच्या जागी वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी, तर पार्थ रेखडेच्या जागी वेगवान गोलंदाज यश ठाकूरला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे.

Nagpur News : सुपर संडे’ ला बाजारपेठेत धनवर्षाव ;वाहन खरेदीपासून ते सोने खरेदी ;ग्राहकांची तुफान गर्दी

सुरुवातीच्या धक्क्यांनी जम्मू-काश्मीर अडचणीत

विदर्भाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. क्यूमरान इक्बाल ९ तर यावर हसन २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर पारस डोगरा आणि कथलप्रीत सिंह यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोगरा बाद झाल्यानंतर संघाच्या अडचणी वाढल्या, कवलप्रीतने एका बाजूने खिंड लढवली: परंतु दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने गडी बाद होत राहिले. नचिकेत भुते, रजनीश गुरबानी आणि यश ठाकूर यांनी महत्त्वाच्या क्षणी बळी घेत जम्मू-काश्मीरच्या धावसंख्येला मर्यादा घातली.

आघाडीसाठी विदर्भाच्या फलंदाजांकडे लक्ष

जम्मू-काश्मीरला २६० धावांत रोखल्यानंतर विदर्भाला पहिल्या डावात आघाडी घेण्याची चांगली संधी आहे. मात्र, श्रीनगरमधील खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेता फलंदाजांना संयम व तंत्राचा कस लावावा लागेल. विदर्भाच्या फलंदाजांनी मोठ्या भागीदारी केल्यास संघाला सामन्यात आपली स्थिती अधिक मजबूत करता येईल.

Nagpur News : भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

कवलप्रीतची झुंज; शतकाने हुलकावणी दिली

जम्मू-काश्मीरकडून कवलप्रीत सिंहने विदर्भाच्या गोलंदाजांचा ठामपणे सामना केला. त्याने १५ वौकारांसह १७६ चेंडूंत ९६ धावा केल्या. मात्र, प्रफुल्ल हिंगेच्या शोवर धावबाद झाल्याने त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले, जम्मू-काश्मीरकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार पारस डोगराने ६७ चेंडूंत ३६, तर यष्टिरक्षक फलंदाज रिथम शर्माने ४५ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले, लोन नासिरने ५३ चेंडूंत २१, तर यावर हसनने ४५ चेंडूत २१ धावा केल्या. या खेळीनतरही जम्मू-काश्मीरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Web Title: Nagpur news vidarbha bowlers deal a blow to jammu kashmir innings ends at 260 runs kawalpreet misses out on a century cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • cricket
  • jammu and kashmir news
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : सुपर संडे’ ला बाजारपेठेत धनवर्षाव ;वाहन खरेदीपासून ते सोने खरेदी ;ग्राहकांची तुफान गर्दी
1

Nagpur News : सुपर संडे’ ला बाजारपेठेत धनवर्षाव ;वाहन खरेदीपासून ते सोने खरेदी ;ग्राहकांची तुफान गर्दी

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…
2

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…

WBBL मधून डार्सी ब्राउन OUT! भारत दौऱ्यात झालेली दुखापत ठरली महागात; आता पुढे काय?
3

WBBL मधून डार्सी ब्राउन OUT! भारत दौऱ्यात झालेली दुखापत ठरली महागात; आता पुढे काय?

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला
4

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.