फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथ्या कसोटीला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांनी त्यांचा दबदबा टाकायला सुरुवात केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने कमालीची फलंदाजी करत मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने ४७४ धावा केल्या आहेत. दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने ३११ धावसंख्येवरून डावाला सुरुवात केली आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर कांगारू संघ शेवटच्या ४ विकेट्समध्ये १५९ धावा जोडण्यात यशस्वी ठरला.
बॉक्सिंग डे कसोटीत वेगवान गोलंदाजीला दुस-या दिवशी कोणतीही धार दाखवली नाही, पण रवींद्र जडेजाने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत डावात एकूण ४ बळी घेतले. पहिल्या दिवसाच्या शेवटी काल ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी मिळून डाव पुढे नेला आणि सातव्या विकेटसाठी ११२ धावांची शतकीय भागीदारी झाली. त्यानंतर मिचेल स्टार्कही बराच वेळ क्रीजवर राहिला आणि स्मिथसोबत त्याने ४४ धावांची भर घातली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा (५७ धावा), मार्नस लॅबुशेन (७२ धावा) आणि सॅम कॉन्स्टन्स (६० धावा) यांनी अर्धशतके झळकावली होती.
Lunch on Day 2 of the 4th Test.
Australia move to 454/7
Scorecard – https://t.co/MAHyB0FTsR… #AUSvIND pic.twitter.com/oee79qHLH9
— BCCI (@BCCI) December 27, 2024
स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या दिवशी वेगवान धावा करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक पूर्ण केले. आता तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम इंग्लंडच्या जो रूटच्या नावावर होता, ज्याने टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत १० शतकी खेळी केली आहे. आकाशदीपचा चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करून स्टंपला लागल्याने स्मिथची विकेटही विचित्र पद्धतीने पडली.
स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांच्या शतकी भागीदारीने मेलबर्न कसोटीत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते. एकवेळ कांगारू संघाने ६ गडी गमावून ४११ धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाजीला धार नव्हती, अशा स्थितीत रवींद्र जडेजाने कमान हाती घेतली, आधी पॅट कमिन्स आणि नंतर मिचेल स्टार्कची विकेट घेतली. त्याने या डावात एकूण ३ विकेट घेतल्या.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये उतरला होता. परंतु तो ओपनिंग करताना सुद्दा फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. मागील दोन सामन्यांमध्ये त्याने केएल राहुलला सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये उतरवले होते. या सामन्यात राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आहे.