IND VS AUS: India's 'Hitman' Sharma in 'action mode', preparations for Australia tour begin; Video goes viral
Rohit Sharma starts practice : आशिया कप २०२५ ला (Asia cup 2025)सुरुवात झाली असून या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघ सध्या यूएईमध्ये आहे. तर त्याच वेळी, एकडे भारतात भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. रोहित शर्मा गेल्या काही काळापासून भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत सराव करत आहे.
रोहित शर्माकडून ११ सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसून येत आहे. रोहित शर्माने व्हिडिओ पोस्ट करून लिहिले की, खूप छान वाटत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हटलाआहे की, मी पुन्हा इथे आहे. त्यानंतर रोहित शर्माने त्याचा क्लास दाखवायला सुरुवात केली.
हेही वाचा : Dubai Pitch Report : Pakistan vs Oman सामन्यात खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? जाणून घ्या सविस्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच, रोहित शर्माकडून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे ते तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून तर या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये तर तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये होणार आहे.
रविवार, ७ सप्टेंबर रोजी अशी बातमी समोर आली आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू भारत अ संघात समाविष्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. जे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळू शकतात. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघामधील हे तीन अनधिकृत एकदिवसीय सामने ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आणि त्याने या दौऱ्यातील किमान एक सामना जरी खेळला तरी तो भारतासाठी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पाचवा खेळाडू ठरणार आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली या दिग्गजांनी असा कारनामा केला आहे.