
IND vs AUS: 'Hitman's' bat will create a record! Rohit Sharma will cross every ball against Australia and...
हेही वाचा : Pak Afghan War : PCB ने निर्लज्जपणाचा गाठला कळस; अफगाणी खेळाडूंच्या मृत्यूनंतर म्हणाले, “बदलीचा विचार करत…”
रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १०० षटकार मारणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनण्याची संधी आहे. आतापर्यंत, त्याने ऑस्ट्रेलियन्सविरुद्ध ४६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८८ षटकार ठोकले आहेत. याचा सरळ अर्थ असा की फक्त १२ षटकार मारल्याने तो ही ऐतिहासिक कामगिरीला गवसणी घालू शकेल. हा विक्रम केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतात त्याचे नाव मोठे करणार आहे.
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा आहे. त्याच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे आणि अचूक वेळेमुळे तो जगातील सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक ठरतो. चाहत्यांना अपेक्षा आहे की, तो त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल आणि आगामी मालिकेत पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस पाडेल.
इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये ४८ षटकारांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ३५ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर असून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३३ षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम देखील ३३ षटकारांसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठ्या कालावधीनंतर मैदानावर उतरणार आहेत. दोघांसाठी देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची असणार आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू शेवटचे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी खेळले होते.