Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल

भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा फक्त त्यांच्या दमदार खेळीमुळेच नव्हे तर त्याच्याकडील आलिशान कार्समुळे देखील चर्चेत असतो. चला रोहित शर्माच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 06:10 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय क्रिकेटर रोहित शर्माकडे आलिशान कार्स
  • बहुतेक कार्सची किंमत कोटींमध्ये
  • जाणून घ्या कार कलेक्शन
भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय फलंदाज Rohit Sharma आपल्या दमदार फलंदाजीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. मैदानावर त्याच्या दमदार खेळी जितक्या चर्चेत असतात, तितकेच त्याचा लक्झरी लाइफस्टाइलही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये इलेक्ट्रिक कारपासून सुपर लक्झरी SUV आणि स्पोर्ट्स कारपर्यंत अनेक महागड्या कार्स आहेत. चला तर मग, त्याच्या कलेक्शनमधील 5 शानदार कार्सबद्दल जाणून घेऊयात.

टेस्ला मॉडेल वाय (Tesla Model Y)

रोहित शर्माने अलीकडेच आपल्या गॅरेजमध्ये Tesla Model Y ही इलेक्ट्रिक SUV समाविष्ट केली आहे. ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसाठी ओळखली जाते. या कारची खास बाब म्हणजे याची लांब ड्रायव्हिंग रेंज. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार सुमारे 622 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यामध्ये ऑटो-पायलट सिस्टम, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि अनेक स्मार्ट फीचर्स दिले आहेत.

Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?

लॅम्बोर्गिनी उरुस एसई (Lamborghini Urus SE)

रोहित शर्माला वेगवान कार्सची विशेष आवड आहे आणि त्यामुळेच त्याच्या कलेक्शनमध्ये Lamborghini Urus SE देखील आहे. ही एक हायब्रिड परफॉर्मन्स SUV असून तिची किंमत सुमारे 4.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. स्पोर्ट्स कारसारखी स्पीड आणि SUV सारखा आराम यांचे उत्तम कॉम्बिनेशन या कारमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे रोहितने आपली जुनी Lamborghini Urus एका फँटसी लीग विजेत्याला भेट देण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे त्याचे चाहतेही खूप आनंदी झाले होते.

रेंज रोव्हर एचएसई (Range Rover HSE)

रोहित शर्माच्या गॅरेजमध्ये Land Rover Range Rover HSE ही लक्झरी SUV देखील आहे. ही कार उत्कृष्ट आराम आणि दमदार डिझाइनसाठी ओळखली जाते. या कारमध्ये 3 लिटर टर्बो डिझेल इंजिन मिळते आणि ती केवळ 6.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. याचा मोठा व्हीलबेस आणि लक्झरी इंटीरियर यामुळे ती सेलिब्रिटीजमध्ये खूप लोकप्रिय आहे.

वाह Kawasaki वाह! 2.89 लाखांची सूट, तरीही ‘या’ सुपरबाईकची किंमत 17.90 लाख रुपये

बीएमडब्ल्यू एम5 (BMW M5)

BMW M5 ही एक जबरदस्त स्पोर्ट्स सेडान असून रोहित शर्माच्या कार कलेक्शनमधील खास गाड्यांपैकी एक आहे. ही कार तिच्या उच्च वेग आणि उत्कृष्ट हँडलिंगसाठी प्रसिद्ध आहे. या कारमध्ये सुमारे 591 bhp इतकी ताकद मिळते आणि ती अतिशय कमी वेळात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.

मर्सिडीज-बेंझ जीएलएस 400डी (Mercedes-Benz GLS 400d)

रोहित शर्माने 2022 मध्ये Mercedes-Benz GLS 400d ही मोठी आणि लक्झरी SUV खरेदी केली होती. अनेक जण या कारला “SUV ची S-Class” असेही म्हणतात. या कारमध्ये 3.0 लिटर डिझेल इंजिन दिलेले असून याचे केबिन खूप प्रशस्त आणि आरामदायक आहे. कुटुंबासोबत लांब प्रवासासाठी ही SUV अतिशय योग्य मानली जाते.

 

Web Title: Rohit sharma car collection tesla model y range rover hse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • automobile
  • Lamborghini
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.