फोटो सौजन्य - imlt20official सोशल मीडिया
इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ : चॅम्पियन ट्रॉफीचा आज २०२५ चा सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे आज सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजर सामान्याकडे वळल्या आहेत. आज भारतीय क्रिकेट संघासाठी महत्वाचा सामना असणार आहे त्यामुळे संघ कशाप्रकारे कामगिरी करेल यावर प्रेक्षकांचे लक्ष्य असणार आहे. तर दुसरीकडे आज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सुद्धा आज अॅक्शनमध्ये असणार आहे. सध्या इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ चे सामने सुरु आहे, यामध्ये भारताचे काही माजी खेळाडू खेळत आहेत. यामध्ये आज इंडिया ब्लास्टर्सचा सामना ऑस्ट्रेलिया ब्लास्टर्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
खरंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीसोबतच, आजकाल आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग २०२५ देखील खेळवली जात आहे. ज्यामध्ये ६ संघ ही स्पर्धा खेळत आहेत. या लीगमध्ये ६ देशांचे माजी महान क्रिकेटपटू खेळत आहेत. या लीगमध्ये इंडिया मास्टर्सचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करत आहे. भारतीय संघासाठी सचिन तेंडुलकर, युवराज सिंह सुरेश रैना, अंबाती रायुडू अशा अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुद्धा अनेक मोठे माजी खेळाडू खेळत आहेत. यामध्ये शेन वॉटसन संघाचे नेतृत्व करत आहे. बेन डक, कॅलम फर्ग्युसन, जेम्स पॅटिन्सन असा अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
इंडिया ब्लास्टर्स आणि ऑस्ट्रेलिया ब्लास्टर्स यांच्यातील हा सामना आज म्हणजेच ५ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता बीसीए स्टेडियम, वडोदरा येथे खेळला जाईल. तुम्ही हा सामना कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्सवर पाहू शकता, याशिवाय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर असेल.
आज इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ मध्ये, सचिन तेंडुलकरचा इंडिया ब्लास्टर्स शेन वॉटसनच्या ऑस्ट्रेलिया ब्लास्टर्स विरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंत इंडिया ब्लास्टर्सने या लीगमध्ये तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने जिंकले आहेत. सध्या, इंडिया ब्लास्टर्स संघ ६ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया ब्लास्टर्सना या लीगमध्ये अद्याप विजयाचे खातेही उघडता आलेले नाही. ऑस्ट्रेलिया ब्लास्टर्स त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.
सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, युवराज सिंग, गुरकीरत सिंग मान, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, नमन ओझा (विकेटकिपर), राहुल शर्मा, अभिमन्यू मिथुन, विनय कुमार, धवल कुलकर्णी, पवन नेगी, शाहबाज नदीम.