फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून कर्णधार रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह सिडनी कसोटीत कर्णधार होताना दिसला. प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहितची अनुपस्थिती सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. त्यामुळे भारताच्या संघामध्ये प्लेइंग ११ मध्ये पाचवा कसोटी सामन्यांमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचेही मोठे वक्तव्य समोर आले आहे.
रोहित शर्मासाठी ही मालिका आतापर्यंत खूपच वाईट होती. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून केवळ ३१ धावा आल्या. या मालिकेत रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला, पण मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर रोहितवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिडनी कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याबाबत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले, “तो पूर्णपणे त्याचा निर्णय होता असे दिसते. एक कर्णधार म्हणून हे खरोखरच कौतुकास्पद आहे. रोहितने एक आदर्श ठेवला आहे.
Sunil Gavaskar said : So Rohit Sharma has opted out himself for Shubman Gill. He is discussing plans with Gambhir and Bumrah. It feels like it was completely his decision. This is truly admirable as a leader. Rohit has set an example.
ROHIT SHARMA IS THE TRUE LEADER.❤️ pic.twitter.com/0ko0HmcyTQ
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) January 2, 2025
जसप्रीत बुमराह सिडनी कसोटीसाठी नाणेफेक करायला आला तेव्हा चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर टॉसदरम्यान बुमराहने सांगितले की, रोहित शर्माने स्वत:ला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधाराने हे प्रथमच पाहिले आहे. कसोटी मालिकेच्या मध्यभागी स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. टीम इंडियाचा माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही रोहितच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडल्यानंतर शुभमन गिलला सिडनी कसोटीत संधी मिळाली आहे. यापूर्वी मेलबर्न कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून गिलला वगळण्यात आले होते, त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तर सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात गिलला फारशी खेळी करता आलेली नाही. पहिल्या डावात २० धावा करून गिल बाद झाला.
भारताच्या संघाने सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात पुन्हा खराब सुरुवात केली आहे. टीम इंडियाचे १६८ धावा करत ६८.२ ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावले आहेत. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे क्रिकेट चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत.