IND vs ENG 4th Test: Prince's run machine 'King' hit! 'Virat' Vikram Khalsa from Gill; 'This' feat done against England..
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. हा सामना रंगतदार वळणार आला आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत जो रूटच्या दीड शतक आणि बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर ६६९ धावा केल्या आणि ३११ धावांची आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. शुभमन गिलने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या असून त्याने विराट कोहलीला पिछाडीवर टाकले आहे.
शनिवारी म्हणजे आजच (२६ जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये शुभमन गिलने ३७ धावा करताच ही कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावाच्या १७ व्या षटकात जोफ्रा आर्चरला चौकार मारताच गिलने हा विक्रम आपल्या नावे केला. २०१६ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान, विराट कोहलीने एकूण पाच सामने खेळले. यामध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने ६५५ धावा केल्या होत्या. आता गिलने विराट कोहलीला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. गिलने तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या ४ सामन्यांमध्ये ३ शतकांसह ६५८ धावा केल्या आहेत. शुभमन गिलला अजून एक सामना खेळायचा बाकी आहे.
हेही वाचा : IND vs ENG: 2 बॉल्स 2 विकेट…पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाचा खेळ खल्लास! डाव तरी वाचवू शकणार का?
यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका भारतीय फलंदाजाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. २०२४ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत, जयस्वालने पाच सामन्यांमध्ये एकूण ७१२ धावा फटकावल्या होत्या. आता गिलला जयस्वालचा विक्रम मोडण्यासाठी आणि पुन्हा नंबर १ चे स्थान मिळवण्यासाठी सध्याच्या सामन्यात आणखी ५५ धावा जोडाव्या लागणार आहेत.
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लिश संघाचा डाव ६६९ धावांवर आटोपला! बेन स्टोक्सचे दमदार शतक; भारत ३११ धावांनी पिछाडीवर.
भारतीय कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या खात्यावर जमा आहे. १९७८-७९ मध्ये भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान, गावस्कर यांनी सहा सामने खेळून त्यामध्ये ७३२ धावा कुटल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी गिलला सध्याच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात किमान ११४ धावांची आवश्यकता आहे. भारतासाठी कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा एकूण विक्रम देखील गावस्कर यांच्या नावावर जमा आहे. १९७१ मध्ये भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर, गावस्कर यांनी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील संघासाठी चार सामन्यांमध्ये ७७४ धावा काढल्या होत्या.