भारत वि इंग्लंड(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. हा सामना खूपच रंजक वळणार आला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत जो रूटच्या दीड शतक आणि बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर ३५८ धावा पार करून ६६९ धावांचा डोंगर उभा केला आहे. आता इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारतासाठी हा सामना जिंकणे अवघड असल्याचे दिसत आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
तत्पूर्वी कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. तर भारताने प्रथम फलंदाजी करत यशस्वी जैस्वाल,साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३५८ धावा उभ्या केल्या होत्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने दोन विकेट्स गमावून २२५ धावा केल्या होत्या. इंग्लंडने २२५ धावांवरून पुढे खेळताना पूर्ण तिसरा दिवस खेळून काढला. तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या जो रूटने शतकी खेळी करून अनेक विक्रम आपल्या नावे केले. रूटने २४८ चेंडूत १५० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १४ चौकार ठोकले आहेत.
हेही वाचा :
इंग्लंडने आपल्या डावाची सुरवात चांगली केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला शतकीय ओपनिंग मिळवून दिली. भारताचे गोलंदाज त्यांच्यापुढे निष्प्रभ दिसून आले होते. झॅक क्रॉली ८४ , बेन डकेट ९४ , ऑली पोप ७१ , जो रूट १५० , हॅरी ब्रुक ०३, जेमी स्मिथ ०९, बेन स्टोक्स १४१ लियाम डॉसन २६, ख्रिस वोक्स ४ , ब्रायडन कार्स ४७ धावा केल्या तर जोफ्रा आर्चर २ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरआणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
आता भारताला या सामन्यात टिकून राहायचे असेल तर इंग्लंडने दिलेली लीड पार करून मोठे धावसंख्या उभी करावी लागणार आहे. अन्यथा भारताला या सामन्यासोबतच मालिका देखील गमवावी लागेल.
हेही वाचा :
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ११
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर