फोटो सौजन्य - X (BCCI)
India vs England 2nd Match Update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामनांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे या मालिकेचा पहिला सामना हेडिग्ले येथे झाला. पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाच शतक चार फलंदाजांनी पूर्ण करूनही भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाने फलंदाजीमध्ये चांगले कामगिरी केली पण गोलंदाजी फार चांगली राहिली नाही. टीम इंडियाचे पहिल्या डावांमध्ये सिराज प्रसिद्ध कृष्णा त्याचबरोबर रवींद्र जडेजा हे गोलंदाज फेल ठरले होते.
दुसऱ्या डावामध्ये प्रसिद्ध कृष्णा याने तीन विकेट्स घेतले होते. बीसीसीआयने आधीच सांगितले होते की, जसप्रीत बुमराह भारतासाठी फक्त तीन सामने खेळणार आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा दुसरा कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नाही. त्या दोन्ही संघांमध्ये दुसरा सामना हा एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे.
भारतीय संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे कारण पहिल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने विजय मिळवून १–० अशी आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह भारतीय संघामधून बाहेर होणार आहेत तर इंग्लंडच्या संघामध्ये जोफ्रा आर्चरची एंट्री होणार आहे असे म्हटले जात आहे. हे नक्कीच भारतीय संघासाठी कठीण असणार आहे कारण भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या डावांमध्ये भारतीय संघासाठी पाच विकेट्स घेतले होते जोफ्रा आर्चर हा एक घातक गोलंदाज आहे. त्यामुळे इंग्लंडला नक्कीच त्याचा फायदा होईल.
टीम इंडियाच्या चॅम्पियन कोचची पुन्हा होणार एंट्री? खराब कामगिरीमुळे गौतम गंभीरचा पत्ता कट होणार?
जसप्रित बुमराह हा सामना खेळला नाही तर अर्शदीप सिंग याला संघामध्ये स्थान मिळु शकते. नाही भारतीय संघामध्ये आणखी एक फिरकी गोलंदाजाला स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतासाठी या सामन्यात जसप्रित बुमराहच्या अनुपस्थित हा सामना जिंकणे हे नक्कीच कठीण असणार आहे.
India’s pace ace Jasprit Bumrah likely to rest, while Jofra Archer is set to return to action! 🔁🔥 pic.twitter.com/7UHOSfOQX1
— CricketGully (@thecricketgully) June 26, 2025
पहिल्या डावांमध्ये भारताच्या संघाने तीन शतक झळकावले होते यामध्ये रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल यांनी चांगली कामगिरी केली होती. तर दुसरा डावामध्ये पुन्हा एकदा ऋषभ पंत दुसरे शतक झळकावळे आणि केएल राहुलने देखील शतक पूर्ण केले होते.