फोटो सौजन्य – X/Youtube
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या चौथा कसोटी सामना सुरु आहे, यामध्ये भारताच्या संघाने दुसऱ्या दिवशी फार काही चांगली कामगिरी केली नाही. टीम इंडीयाला इंग्लडच्या संघाने 358 धावांवर रोखले. आता भारताचा संघ सध्या गोलंदाजी करत आहे. भारताच्या गोलंदाजाला कालच्या सामन्यामध्ये दुसऱ्या इंनिगमध्ये चांगलेच धुतले. टीम इंडीयाने दुसऱ्या इंनिगमध्ये इंग्लडचे फक्त २ फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाली आहे. आता भारताचा संघ तिसऱ्या दिनी कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील चौथी कसोटी सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल दिसून आले, परंतु ज्या खेळाडूची बहुतेक चाहते वाट पाहत होते त्याला यावेळीही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे माजी अनुभवी आर. अश्विनने आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याला चारही सामन्यामध्ये एकही संधी मिळाली नाही. भारताच्या संघाने रविंद्र जडेजा आणि वाॅशिंग्टन सुंदर यांना संधी दिली. कुलदीप यादव हा मॅचविनर आहे त्याने भारतीय क्रिकेटमध्ये अनेकदा चांगली कामगिरी टीम इंडीयासाठी केली आहे. पण भारताच्या संघामध्ये नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीप सारखे खेळाडू नसल्यानंतर कुलदीप संघामध्ये स्थान मिळणार अशी अटकळ बांधली जात होती. आता भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विन याने त्याचा संताप व्यक्त केला.
Picking 2 wickets > scoring 30 runs in the lower order. @ashwinravi99 championing the cause for Kuldeep Yadav’s inclusion in our Day 2 Review of the Manchester Test!
Watch the full video: https://t.co/wZHzIBm7rc pic.twitter.com/RTmm6VthWn
— Kutti Stories with Ash (@crikipidea) July 25, 2025
आता आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर गौतम गंभीरच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले, “पाहा, तुम्ही ८ व्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून २०-३० अतिरिक्त धावांची अपेक्षा करू शकता, परंतु जर तो ८ व्या क्रमांकाचा खेळाडू २-३ विकेट घेतो, तर कसोटी सामन्याचा मार्ग बदलू शकतो. व्यवस्थापनाने नितीश कुमार रेड्डीला लॉर्ड्स आणि बर्मिंगहॅम येथे खेळवण्याचा निर्णय घेतला, परंतु तो अद्याप बेन स्टोक्स नाही.”
Yash Dayal वर दुसरा लैगिंक अत्याचाराचा आरोप, जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत एफआयआर दाखल
अश्विन पुढे म्हणाला, “जेव्हा नितीश कुमार रेड्डी सहाव्या क्रमांकावर खेळू शकत नव्हते, तेव्हा कुलदीप यादवला खेळवणे कठीण काम नव्हते, जरी बुमराहचा कामाचा ताण आता कमी झाला आहे, तरीही ते सोपे काम नाही. कुलदीप यादवची उणीव भासत आहे. पुढे तो म्हणाला की मला जर कोणी सांगितले असते की कुलदीप हा चार सामने खेळणार नाही तर मला नक्कीच धक्का बसला असता. २०-३० धावांची ती आघाडी आता संपली आहे.”
मँचेस्टर कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये करुण नायर, नितीश रेड्डी आणि आकाश दीप यांचा समावेश नाही. तर साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.