Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : जसप्रीत बूमराहचा पंजा; इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर संपला, भारताकडे ६ धावांची आघाडी..  

इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर संपला असून बूमराहने ५ विकेट्स घेतल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 22, 2025 | 08:33 PM
IND Vs ENG: Jasprit Bumrah's claw; England's first innings ended at 465 runs, India has a lead of 6 runs..

IND Vs ENG: Jasprit Bumrah's claw; England's first innings ended at 465 runs, India has a lead of 6 runs..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात झाली आहे.  हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला  सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा उभारल्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी दमदार शतकं ठोकली आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने ऑली पोपचे शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या जोरावर ४६५ धावा केल्या. भारताला ६ धावांची छोटी आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बूमराहने ५ विकेट्स मिळवल्या. तर  प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट मिळवल्या.

भारताच्या  दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंडने पहिल्या डावात तीन विकेट गमावून २०९ धावा केल्या होत्या, तर तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडने ४०० धावांचा टप्पा ओलांडाला. यामध्ये इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने शानदार अर्धशतक करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान त्याला तीन जीवनदान मिळाले. तरी देखील त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो ९९ धावांवर बाद झाला.

तिसऱ्या दिवशी हॅरी ब्रूकने संघाची सारी सूत्रे हातात घेतली आणि भारतीय गोलंदाजवर चांगलाच हल्लाबोल केला. या दरम्यान त्याला तीन जीवनदान मिळाले. त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. नजाकत असलेले फटके मारले. त्याने भारतीय गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. तो आपले शतक पूर्ण करणार असे वाटत असताना प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो शार्दुल ठाकूरकडे झेल दुण बसला आणि त्याचे शतक हुकले. ब्रूकने ११२ चेंडूचा सामना करत ९९ धावा केल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले.  तोपर्यंत त्यान आपल्या संघाला चांगल्या स्थितित आणले होते.

हेही वाचा : ‘रोहित-कोहली २०२७ च्या विश्वचषकात दिसणार नाहीत’, माजी भारतीय खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी…

तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी इंग्लंड धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. संघाची सुरवात फारसी चांगली झाली नाही. जसप्रीत बूमराहने  जॅक क्रॉलीला ४ धावांवर असताना माघारी पाठवले. त्यानंतर आलेला ऑली पोप आणि बेन डकेट यांनी डाव सावरला. बेन डकेट ६२ धावांवर बूमराहचा शिकार ठरला. त्यानंतर आलेला इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने थोडे स्थिरावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही बूमराहने २८ धावांवर असताना त्याला माघारी पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या शेवटी ऑली पोपने शतक साजरे केले. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड संघाने तीन गडी गमावून २०९ धावा केल्या होत्या.

इंग्लंडने २०९ पासून पुढे सुरवात केली. या दरम्यान बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक यांनी डाव पुढे नेला. त्यानंतर मोहम्मद सिराजने बेन स्टोक्सला माघारी पाठवले.  बेन स्टोक्सने  ५२  चेंडूत २० धावा केल्या. त्यानंतर यष्टीरक्षक जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी डाव सावरला. जेमी स्मिथने काही आक्रमक फटके खेळले. त्याने हॅरी ब्रूकला चांगली साथ दिली. जेमी स्मिथ ४० धावांवर प्रसिद्ध कृष्णाचा शिकार ठरला. तर ब्रूक ९९ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात ख्रिस वोक्स(३८) आणि ब्रायडन कार्स(२२) आक्रमक सुरवात केली. कार्सला मोहम्मद सिराजने तर वोक्सला जसप्रीत बूमराहने आऊट केले. जोश टंगला बूमराहने बाद करून इंग्लंडची पारी संपवली. तर शोएब बशीर १ वर नाबाद राहिला.  भारताकडून जसप्रीत बूमराहने सर्वाधिक ५ विकेट्स मिळवल्या. तर  प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट आणि  मोहम्मद सिराजने २ विकेट्स घतेल्या तर रवींद्र जाडेजाला मात्र विकेट मिळवता आली नाही.

हेही वाचा : IND Vs ENG : Rishabh Pant एक्सप्रेस सुसाट! विकेटमागे केला भीम पराक्रम, असे करणारा ठरला तिसरा भारतीय

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन,  करुण नायर,  रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,  प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.

Web Title: Ind vs eng englands first innings ended at 465 runs jasprit bumrah took 5 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • Harry Brook
  • IND Vs ENG
  • Jaspreet Bumrah

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ
2

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
3

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

Asia cup 2025 : जसप्रीत बुमराह की शाहीन आफ्रिदी कोण आहे वरचढ? आशिया कपमध्ये कोणाची आहे चलती? वाचा सविस्तर..
4

Asia cup 2025 : जसप्रीत बुमराह की शाहीन आफ्रिदी कोण आहे वरचढ? आशिया कपमध्ये कोणाची आहे चलती? वाचा सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.