Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! पण इंग्लंडने शेवटच्या क्षणी मारली बाजी; हाँगकाँग सिक्सेसमध्ये Team India चा सलग तिसरा पराभव

IND vs ENG England Beat India in Hong Kong Sixes 2026: हाँगकाँग सिक्सेस २०२६ मध्ये, भारतीय संघ प्रथम पाकिस्तानकडून हरला. त्यानंतर, त्यांना युएईकडूनही पराभव पत्करावा लागला. आता, तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 03:45 PM
England Beat India in Hong Kong Sixes 2026

England Beat India in Hong Kong Sixes 2026

Follow Us
Follow Us:
  • गोलंदाजांनी लुटवल्या धावा, फलंदाजांची झुंजही अपुरी
  • भारताची पराभवाची हॅट्ट्रिक
  • इंग्लंडने भारताच्या विजयावर फिरवलं पाणी
IND vs ENG: हाँगकाँग सिक्सेस २०२६ मध्ये,शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ६ षटकांत २ विकेट्स गमावून १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ ६ विकेट्स गमावून केवळ १२१ धावाच करू शकला. भारताने हा सामना ३ धावांनी सामना गमावला. भारतीय संघाने शेवटपर्यंत झुंज दिली, पण तरीही हा त्यांना सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

इंग्लंडने उभारला मोठा स्कोअर

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने धडाकेबाज सुरुवात केली. मार्टिन अँडरसनने अवघ्या १३ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. ३९२.३१ च्या स्ट्राईक रेटने खेळताना अँडरसनने तीन चौकार आणि सहा जबरदस्त षटकार ठोकले. सलामीवीर जॉन सिम्पसनने सात धावांची भर घातली. एड बर्नार्डनेही १४ चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावांची खेळी केली. २५० च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने चार षटकार ठोकले. ल्यूक हॉलमननेही सहा चेंडूंमध्ये १३ धावा केल्या.

यामुळे इंग्लंडला ६ षटकांत २ विकेट्स गमावून १२४ धावा करता आल्या. टीम इंडियाकडून राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. यादरम्यान, कुलवंत खेजरोलियाने २ षटकांत ३७ धावा दिल्या. राहुल तेवतियानेही २० धावा दिल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाज खूपच निराशाजनक ठरले. यामुळे टीम इंडिया पहिल्याच डावात मोठ्या फरकाने मागे पडली.

भारतीय संघाचा सलग तिसरा दारुण पराभव

१२५ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. नितीश राणा अवघ्या चार धावांवर बाद झाला. सलामीवीर शशांक सिंगने नऊ चेंडूंमध्ये चार षटकारांसह २९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुल त्रिपाठीने दोन चौकार आणि सात षटकारांसह अवघ्या १४ चेंडूंमध्ये नाबाद ५६ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ४०० होता. राहुल तेवतियाला आपले खाते उघडता आले नाही.

कर्णधार कृणाल पांड्याने अखेर २ चौकार आणि ३ षटकारांसह ७ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावा केल्या. असे असूनही, भारतीय संघ ६ षटकांत ४ विकेट्स गमावून १२१ धावांवर होता. टीम इंडियाने हा सामना ३ धावांनी हरला. इंग्लंडकडून नॅथन गिलक्रिस्टने २ षटकांत २५ धावा देऊन २ विकेट्स घेतले. तर जॅक कार्सनने १ विकेट घेतला.

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव

Web Title: Ind vs eng hong kong sixes 2026 england beat india third consecutive defeat pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Hong Kong Sixes
  • IND Vs ENG
  • krunal pandya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.