NZ Beat IND 4th t20
प्रत्युत्तरात, भारतीय संघ मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ विकेट्स गमावून केवळ १७२ धावाच करू शकला. धावांच्या बाबतीत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. ( Shreyas Iyer)
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताला दुसऱ्या सर्वात मोठ्या टी२० आंतरराष्ट्रीय पराभवाला सामोरे जावे लागले. याच वर्षाच्या सुरुवातीला भारताला श्रेयस अय्यरच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०२६ मध्ये नॉटिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताला १२५ धावांनी पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७ विकेट्स गमावून २०१ धावा केल्या. परंतु प्रत्युत्तरात भारताची फलंदाजी पूर्णपणे कोसळली आणि केवळ ११.४ षटकांत ७६ धावांवर त्यांचा डाव गुंडाळला.
न्यूझीलंडविरुद्धचा ८७ धावांचा पराभव आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. दरम्यान, २०१९ मध्ये न्यूझीलंडने भारताला ८० धावांनी पराभूत केले होते. जो भारताचा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. याशिवाय, २०२६ मध्ये अहमदाबाद येथे भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
New Zealand win by 87 runs in Auckland.Our focus shifts to the 5th T20I in Hamilton on Sunday. Scorecard ▶️ https://t.co/fx264c9iLe#TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/mZccr7XMfl — BCCI (@BCCI) October 30, 2026
ऑकलंडमधील ईडन पार्क येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात, न्यूझीलंडने आपल्या निर्धारित २० षटकांत ७ विकेट्स गमावून २५९ धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सने ४९ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दहा षटकारांसह १०७ धावांचे धडाकेबाज शतक झळकावले. मायकल ब्रेसवेलने ६५ धावा आणि फिन ॲलनने ३१ धावांची भर घातली. २६० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. भारताने पहिल्याच षटकात दोन विकेट्स गमावले. संजू सॅमसन केवळ चार धावांवर बाद झाला, तर ईशान किशनला आपले खाते उघडता आले नाही.
त्यानंतर अभिषेक शर्मा २७ धावांवर बाद झाला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने ११ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. दरम्यान, अक्षर पटेल ७ धावांवर आणि नितीश कुमार रेड्डी २१ धावांवर बाद झाले. तिलक वर्माने सर्वाधिक ३५ धावा केल्या, तर नमन धीरने २८ आणि प्रिन्स यादव १८ धावांवर नाबाद राहिले. परंतु, दोन्ही डाव भारताला विजयाच्या जवळ नेऊ शकले नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे हतबल झाले आणि २० षटकांत ९ विकेट्स गमावून केवळ १७२ धावाच करू शकले. न्यूझीलंडकडून जेकब डफीने सर्वाधिक विकेट्स घेतले, तर कर्णधार मिचेल सँटनर आणि मॅथ्यू फिशर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.
U19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! द्रविड-सहवागच्या लेकांची संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण स्क्वॉड






