Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ICC ने शतकवीर ऋषभ पंतला चांगलेच फटकारले, मैदानात पंचांसोबत ‘ती’ वागणूक पडली महागात; मिळाली ‘ही’ शिक्षा.. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. लीड्स कसोटी सामन्यादरम्यान पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल ऋषभ पंतला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 24, 2025 | 03:38 PM
IND Vs ENG : ICC reprimands century-winner Rishabh Pant, 'that' behavior with the umpires on the field cost him dearly; got 'this' punishment..

IND Vs ENG : ICC reprimands century-winner Rishabh Pant, 'that' behavior with the umpires on the field cost him dearly; got 'this' punishment..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG  : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला असून भारताने इंग्लंडसमोर ४७१ धावांचे टार्गेट दिले आहे. तर प्रतिउत्तरत चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने २१ धावा केल्या आहेत. जॅक क्रॉली १२ धावा आणि बेन डकेट ९ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. भारताकडून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके लागावली. या सामन्यादरम्यान भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने मोठी चूक झाली आहे, त्यावरून आयसीसीने त्याला चांगलेच फटकारले आहे. जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे?

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची सामन्यासाठीची बंदी टळली आहे. परंतु, लीड्स कसोटी सामन्यादरम्यान पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने ऋषभ पंतला फटकारले आहे आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. जो भविष्यात त्याच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. चेंडू बदलण्याचे आवाहन पंचांकडून बॉल गेजने तपासल्यानंतर फेटाळण्यात आले. ज्यामुळे पंतचा रंग अनावर झाला आणि त्याने रागात चेंडू फेकून दिला.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘माझ्या स्थानाबद्दलच्या चर्चांना माझ्यावर परिणाम नाही..’, इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपने केला मोठा खुलासा

आयसीसीने एका मीडिया निवेदनात म्हटले आहे की, ‘रविवारी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल ऋषभ पंतला अधिकृतपणे फटकारण्यात आले आहे. पंतने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केल्याचे दिसून आले, जे “आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविण्याशी” संबंधित आहे.’ आयसीसीने पंतला फटकाराव्यतिरिक्त, पंतच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

नेमकं काय घडलं?

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ६१ व्या षटकाच्या शेवटी हा प्रकार घडला आहे. जेव्हा पंचांनी बॉल गेजने चेंडूचा आकार तपासला आणि तो बदलू नये असा निर्णय घेण्यात आला. पंत या निर्णयावर खुश नव्हता. त्याने पंचांसमोर जमिनीवर चेंडू फेकून दिला, या कृतीने त्याने  पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविली. पंतने आपला गुन्हा कबूल केला आणि सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा देखील स्वीकारली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

हेही वाचा : ENG vs IND : इंग्लडच्या मैदानावर ऋषभ पंतचा पराक्रम, सचिनच्या विक्रमाची बरोबरी! वाचा सविस्तर

मैदानावरील पंच पॉल रीफेल आणि ख्रिस गॅफनी, तिसरे पंच शरफुद-उद-दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच माइक बर्न्स यांच्याकडून ऋषभ पंतवर हा आरोप करण्यात आला होता. लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी किमान दंड म्हणजे अधिकृत फटकार, जास्तीत जास्त दंड खेळाडूच्या मॅच फीच्या ५० टक्के आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स आहे. जर एखाद्या खेळाडूला २ वर्षांच्या आत चार डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले  एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी घालण्यात येते.

Web Title: Ind vs eng icc reprimanded centurion rishabh pant got this punishment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • ICC
  • IND Vs ENG
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
2

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
3

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
4

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.