फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे. आजच्या या सामन्यात इंग्लंडचे संघाला विजयासाठी 350 धावांची गरज आहे. पहिला डावामध्ये भारताच्या तीन फलंदाजांनी शतक झळकावले होते तर दुसरा डावात दोन बॅट्समन स्टार ठरले. भारताच्या संघाने इंग्लंड समोर 371 धावांचे लक्ष उभे केले आहे. आता भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत आणि त्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावले आणि रेकॉर्ड नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये ऋषभ पंतची बॅट जोरात बोलली.
पहिल्या डावात १३४ धावा काढल्यानंतर पंतने दुसऱ्या डावातही शतक ठोकून इतिहास रचला. ऋषभने दुसऱ्या डावात १४० चेंडूंचा सामना केला आणि ११८ धावा केल्या. या डावात त्याने १५ चौकार आणि ३ षटकार मारले. एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत हा पहिला भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर एका खास प्रकरणात पंतने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे.
दुसऱ्या डावात ऋषभ पंतने आपला डाव संथ पद्धतीने सुरू केला. मात्र, क्रीजवर सेट झाल्यानंतर पंतने खूप धमाल केली. पंतने शानदार फलंदाजी केली आणि १४० चेंडूत ११८ धावांची वेगवान खेळी केली. या डावात भारतीय उपकर्णधाराने १५ चौकार आणि तीन उत्तुंग षटकार मारले. पंत एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. यासह, इंग्लंडच्या भूमीवर पंतच्या बॅटवरून हे चौथे शतक आहे.
He’s steely, He’s Bold 💥
When Rishabh Pant bats, the records are never on hold 😎
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/UuNea6WmiS
— BCCI (@BCCI) June 23, 2025
इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत पंतने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने इंग्लंडमध्येही चार शतके केली आहेत. आता या यादीत पंतच्या पुढे फक्त राहुल द्रविड आहे. द्रविडने इंग्लंडमध्ये एकूण ६ शतके केली आहेत.
क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन
लीड्समध्ये खेळला जाणारा पहिला कसोटी सामना एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. दुसऱ्या डावात संपूर्ण भारतीय संघ ३६४ धावा करून सर्वबाद झाला. केएल राहुलने शानदार फलंदाजी केली आणि १३७ धावांची अद्भुत खेळी केली. त्याच वेळी पंतने ११८ धावा केल्या. तथापि, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही टीम इंडियाने अनेक विकेट्स गमावल्या. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या डावात इंग्लिश संघाने एकही विकेट न गमावता २१ धावा स्कोअरबोर्डवर ठेवल्या आहेत.