ऑली पोप(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या पहिल्या सामन्यातील चार दिवस खेळून झाले असून भारताने आपल्या दुसऱ्या डावाटीबी इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान दिले आहे. तर चौथ्या दिवसाच्याअखेर जॅक क्रॉली १२ धावांसह आणि बेन डकेट ९ धावांसह खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. त्यांना आता पहिली कसोटी जिंकण्यासाठी ३५० धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान इंग्लंडचा फलंदाज ऑली पॉपने मोठा खुलासा केला आहे.
गेल्या वर्षी भारताविरुद्ध त्याच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर संघात त्याच्या स्थानाबद्दलच्या चर्चेकडे लक्ष न दिल्याने त्याला पुनरागमन करण्यास मदत झाली असे मत इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ऑली पोपने व्यक्त केले.
हेही वाचा : ENG vs IND : इंग्लडच्या मैदानावर ऋषभ पंतचा पराक्रम, सचिनच्या विक्रमाची बरोबरी! वाचा सविस्तर
इंग्लंडचा उपकर्णधार पोपने गेल्या वर्षी हैदराबादमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १९६ धावा करून चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि भारतीय फिरकीपटूंना त्याची कमजोरी उघड करण्यास वेळ लागला नाही. पुढील चार सामन्यांमध्ये तो फक्त ४० धावा करू शकला, ज्यामुळे संघातील त्याच्या स्थानाबद्दल चर्चा सुरू झाल्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १०६ धावा करणाऱ्या पोपने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, या चर्चाचा माझ्यावर फारसा परिणाम होऊ देऊ नये यासाठी मी प्रयत्न केला आहे. मी फक्त माझा खेळ शक्य तितका चांगल्या स्थितीत आहे याची खात्रीकरण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा मी फलंदाजीसाठी बाहेर जातो तेव्हा मी संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. मी बाहेर होणाऱ्या चर्चाकडे लक्ष दिले नाही आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या बळकट करण्यावर आणि माझा खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा : IND Vs ENG : जो रूटने रचला इतिहास! आता फलंदाजी नाही तर ‘या’ गोष्टीत केला मोठा विक्रम
पोपने त्याची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून त्याला त्याच्या पहिल्या ३० धावा पूर्ण करण्यासाठी जास्त दबाव जाणवू नये आणि नंतर तो मोठी खेळी खेळण्यास तयार असेल. माझा खेळ थोडा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे. तो त्या प्रक्रियेशी संबंधित आहे ज्याचा मी आनंद घेऊ इच्छितो आणि पुढे जाऊ इच्छितो. मी धावा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई दाखवू इच्छित नाही. माझा प्रयत्न माझा बचाव शक्य तितका चांगला ठेवण्याचा आहे.