Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

२०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक खेळाडू वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची खेळी करत अनेक विक्रम रचले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 07:01 PM
U19 World Cup Final: Just one match, and...! Vaibhav Suryavanshi unleashes a flurry of records; a explosive innings of 175 runs in the final.

U19 World Cup Final: Just one match, and...! Vaibhav Suryavanshi unleashes a flurry of records; a explosive innings of 175 runs in the final.

Follow Us
Follow Us:

Vaibhav Suryavanshi sets a record in Under-19 cricket : २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या  अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. यांच्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात  भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर षटकात ९ गडी गमावून ४११ धावा केल्या आहेत. या दरम्यान,  भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने विक्रमी खेळी साकारली आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या ८० चेंडूत १७५ धावांची धुव्वाधार खेळी केली आहे. या खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

हेही वाचा : IND vs ENG: वैभव सूर्यवंशीचा U19 World Cup Final मध्ये रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला विश्वातील पहिलाच फलंदाज

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १७५ धावा केल्या. या खेळीदरम्यान वैभवने १५ षटकार आणि १५ चौकार लगावले. यासह, वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने रचेलले विक्रम जाणून घेऊया.

वैभव सूर्यवंशीने रचलेले विक्रम

फायनलमध्ये सर्वात मोठा डाव खेळणे

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात १७५ धावा फटकावल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम ठरला आहे. या यादीत उन्मुक्त चंद दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्याने २०१२ मध्ये भारताकडून खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १११ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट विल्यम्स (१०८), इंग्लंडचा स्टीफन पीटर्स (१०७) आणि भारताचा मनजोत कालरा (१०१*) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर येतात.

१९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार

वैभव सूर्यवंशी १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. या आवृत्तीत त्याने एकूण ३० षटकार लगावले आहेत. यासह वैभवने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला पिछाडीवर टाकले आहे. ज्याने २०२२ मध्ये १८ षटकार मारले होते.

एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात एकूण १५ षटकारांची आतिषबाजी केली. तो १९ वर्षांखालील विश्वचषकात एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकेल हिल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये नामिबियाविरुद्ध १२ षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रेग सिमन्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून  त्याने २००२ मध्ये केनियाविरुद्ध ११ षटकार ठोकले होते.

Bigger the stage 🤝 Bigger the impact 🫡 Vaibhav Sooryavanshi with a record-breaking outing 👏 Updates ▶️ https://t.co/hisult6ODX #U19WorldCup pic.twitter.com/ZqS2BaddWo — BCCI (@BCCI) February 6, 2026

हेही वाचा : WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL

युवा एकदिवसीय डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सूर्यवंशीच्या नावावर जमा आह. डिसेंबरमध्ये आयसीसीए दुबई येथे यूएई १९ वर्षांखालील विरुद्ध त्याने १४ षटकार मारण्याचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला होता.

१९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावांचा विक्रम

१९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रम सूर्यवंशीच्या नावे जमा आहे. त्याने ७१ चेंडूत ही कामगिरी करण्याची किमया साधली आहे. त्याच स्पर्धेत इंग्लंडच्या बेन मेयसने त्याच मैदानावर स्कॉटलंडविरुद्ध ९८ चेंडूत १५० धावा फटकावल्या होत्या. वैभवने आता १९ वर्षांखालील विश्वचषकात दुसरे सर्वात जलद शतक गाठले आहे, त्याने ५५ चेंडूत ही कामगिरी बजावली आहे.

Web Title: Ind vs eng in the u19 world cup final vaibhav suryavanshis innings of 175 runs broke several records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • U19 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
1

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
2

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
3

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.