वैभव सूर्यवंशीने रचला विक्रम(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG U19 World Cup Final LIVE : हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात जेतेपदासाठी लढाई सुरू आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा स्फोटक अंदाज दाखवून ८० चेंडूत १७५ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने इतिहास लिहिला आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने एक मोठा टप्पा गाठला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, वैभव सूर्यवंशीने पाचपेक्षा जास्त षटकार मारून इतिहास घडवला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीपूर्वी, १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देवाल्ड ब्रेबिसच्या नावावर जमा होता. २०२२ मध्ये ब्रेबिसने १८ षटकार लागावले होते. या यादीत फिन अॅलनचा देखील समावेश आहे, त्याने २०१६ आणि २०१८ मध्ये १८ षटकार मारले आहेत. आता, या हंगामात, वैभव सूर्यवंशीने सर्व षटकार मोडून एक नवीन विक्रम रचला आहे.
हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर आरोन जॉर्ज ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सांभाळत चांगली भागीदारी रचली. वैभव आणि म्हात्रे या दोघांनी १४२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला अॅलेक्स ग्रीनने बाद केले. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार लगावले. शतकानंतर वैभव सूर्यवंशी अधिक घातक बनला.
1⃣7⃣5⃣ runs
8⃣0⃣ balls
1⃣5⃣ fours & 1⃣5⃣ sixes A marathon knock by Vaibhav Sooryavanshi on a grand stage 👏👏 India U19 283/3 after 30 overs. Updates ▶️ https://t.co/hisult7mtv #U19WorldCup pic.twitter.com/NL2r2ux1lT — BCCI (@BCCI) February 6, 2026
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तो दुहेरी शतक लगावेल असे वाटत असतानाच तो १७५ धावांवर बाद झाला. त्याने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकरांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. त्याला मॅनी लुम्सडेनने बाद केले. तोपर्यंत त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहचवले होते.
इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन
भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन






