IND vs ENG: Big blow to India! Lost two batsmen in the first session, debutant Sai Sudarshan returned to zero..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेला सुरवात झाली आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारताची सुरवात आश्वासक झाली खरी परंतु भारताला पहिल्या सेशन अखेर आपले दोन महत्वाचे फलंदाज गमवावे लागले. सुरवातीला केएल राहुल ४२ धावांवर बाद झाला तर तिसऱ्या जागी फलंदाजीला आलेला पदार्पणवीर साई सुदर्शन तर भोपळा देखील फोडता आला नाही. त्याला
हेडिंग्ले, लीड्स येथे पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर भारत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताची डावाची सुरवात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी केली. भारताची सुरवात चांगली झाली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच झुलवले. दोघांनीही चौफेर फटकेबाजी केली तसेच वेळोवेळी संयमाने देखील खेळताना दिसून आले. परंतु, २५ व्या षटकात फटका मारण्याच्या नादात केएल राहुल स्लिपमध्ये झेल देऊन बसला. त्याने ७८ चेंडूचा सामना करत ४२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार लगावले. त्याला ब्रायडन कार्सने माघारी पाठवले.
Lunch 🍱 on the opening day of the 1st Test.#TeamIndia move to 92/2, Yashasvi Jaiswal unbeaten on 42*
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/21wp9iQQKb
— BCCI (@BCCI) June 20, 2025
केएल राहुलची विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर पदार्पणवीर साई सुदर्शन फलंदाजीला आला. आयपीएल २०२५ कहा हंगामा गाजवणाऱ्या या खेळाडूकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, तो चौथ्या चेंडूवरच शून्यावर बाद झाला. त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपला शिकार बनवले. भारतीय संघाने २ विकेट्सछाया बदल्यात ९२ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वाल ७४ चेंडूचा सामना करत ४२ धावांवर खेळत आहे. यानंतर लंच ब्रेक घेण्यात आला असून खेळ थंबवण्यात आला आहे.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.