फोटो सौजन्य : X
भारताचा अ आज पासून इंग्लंड लायन्स विरुद्ध मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा आज पहिला सामना आहे, त्यानंतर भारताचा मुख्य संघ हा 20 जून पासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुभारंभ करणार आहे. यावेळी भारताच्या संघाचे नेतृत्व शुभमन गील करणार आहे. त्याचबरोबर हरमनप्रीत कारच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ एक दिवसीय मालिका आणि टी-ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसरीकडे अंडर 19 चा युवा खेळाडूंचा संघ देखील इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतीय वेगळ्या दर्जाचे सक्षम क्रिकेट परिषदने आणखी एक संघाची घोषणा केली आहे, यासाठी भारताचा संघ हा इंग्लंड दौऱ्यावर टी-ट्वेंटी मालिकेसाठी जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मिक्स्ड डिसएबिलिटी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जून आणि जुलै २०२५ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या सात सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय अपंगत्व परिषद (DCCI) ने भारतीय पुरुष मिश्र अपंगत्व संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी मुख्य संघात १६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, ४ खेळाडूंना राखीव म्हणून निवडण्यात आले आहे.
GT vs MI Eliminator weather Report : आजच्या सामन्याचा खेळ पाऊस खराब करणार? वाचा हवामानाचा अहवाल
मिक्स्ड डिसॅबिलिटी व्हिटॅलिटी टी20 मालिकेचा पहिला सामना 21 जून 2025 रोजी टॉन्टन येथे खेळला जाईल, त्यानंतर दुसरा सामना 23 जून रोजी वर्म्सली येथे खेळला जाईल. 3 जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता होणाऱ्या सातव्या टी20 सामन्याने मालिकेचा शेवट होईल. या मालिकेसाठी रवींद्र गोपीनाथ साने यांच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी वीरेंद्र सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे.
🇮🇳 Ravindra Sante-led #PanDisabilityTeamIndia is READY for the IT20 Mixed Disability Series in England! 🏏💪
Here’s the full squad representing 🇮🇳 with pride & purpose!
7 matches | June–July 2025 | Historic venues ✨#ENGvIND | @BCCI | @ECB_cricket | #DisabilityCricket @ICC pic.twitter.com/zpFC5aoF8Z
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) May 29, 2025
रविंद्र गोपीनाथ साने (कर्णधार) (पीडी), वीरेंद्र सिंह (उप-कप्तान) (मूकबधिर), राधिका प्रसाद (पीडी), राजेश इरप्पा कन्नूर (पीडी), योगेन्द्र सिंह (विकेटकीपर), नरेंद्र मंगोरे (पीडी), विक्रांत रविंद्र केनी (पीडी), साई आकाश (मूकबधिर), उमर अशरफ (मूकबधिर), संजू शर्मा (मूकबधिर), अभिषेक सिंह (मूकबधिर), विवेक कुमार (मूकबधिर), विकास गणेशकुमार (आईडी), प्रवीण नैलवाल (आईडी), ऋषभ जैन (आईडी), तरुण (आईडी)
राखीव खेळाडू:
माजिद मगर (पीडी), कुलदीप सिंग (मूकबधिर), कृष्णा गौडा (मूकबधिर), जितेंद्र नागराजू (पीडी)