फोटो सौजन्य : X
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स सामन्यात हवामानाचा अहवाल : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स यांच्यामध्ये आज सर्वात महत्वाचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवेल तो संघ काल पराभुत झालेल्या पंजाब किंग्सशी सामना करणार आहे हा सामना रविवारी 1 जून रोजी खेळवला जाईल. जो संघ आज पराभुत होइल तो संघ स्पर्धेच्या बाहेर होणार आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना शुक्रवारी मुल्लानपूर येथे खेळला जाईल.
हा सामना गुजरात आणि मुंबई दोघांसाठीही करा किंवा मरो असा आहे. या सामन्याचे आयोजन, मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचा धोका आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर अशा परिस्थितीत गुजरातचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल तर मुंबई संघ बाहेर पडेल. खरंतर, लीग टप्प्यातील पॉइंट्स टेबल रँकिंग अनिर्णीत सामन्यांच्या बाबतीत उपयोगी पडते. आयपीएल २०२५ चा लीग टप्पा संपला तेव्हा गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर होते तर मुंबई चौथ्या स्थानावर होती. सामना रद्द झाल्यास, चांगल्या क्रमांकाच्या संघाला प्राधान्य दिले जाते आणि कमी क्रमांकाच्या संघाला नुकसान सहन करावे लागते.
IND vs ENG : इंग्लंड लायन्सच्या संघाने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! पाहा दोन्ही संघाची Playing 11
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, नवीन चंदीगडमध्ये तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यानही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहते ४० षटकांचा खेळ पाहण्याची अपेक्षा करू शकतात. पण जर हवामानामुळे सामना रद्द झाला तर, गुजरात क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असल्याने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, गुजरात आणि मुंबई दोघांनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंची उणीव भासेल. मुंबईने रायन रिकेल्टन, विल जॅक्स आणि कॉर्बिन बॉश यांना वगळले आहे तर टायटन्सला अनुभवी जोस बटलरची संधी मिळणार नाही. दोन्ही संघांना त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करावे लागू शकतात. मुंबई इंडियन्स सलामीच्या सामन्यात रिकेल्टनच्या जागी जॉनी बेअरस्टोला संधी देऊ शकते आणि विल जॅक्सच्या जागी चॅरिट अस्लंकाला संधी मिळणे जवळजवळ निश्चित आहे. त्याच वेळी, गुजरात टायटन्स जोस बटलरच्या जागी कुसल मेंडिसला संधी देऊ शकते.